अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूड कलाकारांची जामनगरमध्ये मांदियाळी पाहायला मिळत आहे. १ मार्च ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक प्रसिद्ध कलाकारांना निमंत्रित करण्यात आलंय. या सोहळ्यासाठी कपूर कुटुंबानेसुद्धा जामनगरमध्ये हजेरी लावली आहे.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, राहा कपूर आणि नीतू कपूर सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अशातच कपूर कुटूंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात रणबीर आणि आलिया लेक राहाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत.

हेही वाचा… VIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल

रणबीर आणि आलियाच्या फॅन पेजेसवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो जामनगरमधील असल्याचं म्हटलं जातंय. यात रणबीर व आलिया राहाबरोबर खेळताना दिसत आहेत. या फोटोमध्ये चित्रपट निर्माता अयान मुखर्जीही कपूर कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “छोटी आलू”, “सुंदर कुटुंब” अशा अनेक कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत.

आलिया, रणबीर, राहा आणि नीतू कपूर मुंबईहून जामनगरसाठी गुरूवारी (२९ फेब्रुवारी) निघाले होते. जामनगरमध्ये त्यांचं स्वागत एकदम जल्लोषात झालं. रोल्स रॉईस कारमधून कपूर कुटुंबाची जामनगरमध्ये दमदार एन्ट्री झाली. या सोहळ्यासाठी आलियाने निळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. याचे फोटो आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

हेही वाचा… राधिका मर्चेंटने प्री-वेडिंग सोहळ्यात अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीचा लूक केला रिक्रिएट; चाहते म्हणाले, “हा ड्रेस…”

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील आज दुसरा दिवस आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ड्रेस कोड ‘जंगल थीम’ असल्याच म्हटलं जातय. फेसबूकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने वाघ आणि फुला-पानांची प्रिंट असलेला शर्ट परिधान केला आहे आणि याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘वाईल्ड आऊट हिअर’असं कॅप्शनही मार्क झुकरबर्गने दिलं आहे.