अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. प्री-वेडिंगसाठी अंबानी कुटुंबीयांनी गुजरातमधील जामनगरमध्ये खास तीन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला बॉलीवूडपासून राजकीय विश्वातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामनगरमध्ये पहिल्याच दिवशी ( १ मार्च ) हॉलीवूड गायिका रिहानाने परफॉर्म केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी दिलजीत दोसांझच्या पंजाबी गाण्यांवर थिरकले. लाइव्ह परफॉर्म करून गायकाने सर्वांची मनं जिंकून घेतली. शाहरुख खान, करीना कपूर, करिश्मा कपूरसह अनेक कलाकार दिलजीतच्या लाइव्ह परफॉर्मन्सवर डान्स करत असल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये नीता अंबानी दिलजीतबरोबर गुजराती भाषेत संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : थाटात एन्ट्री, सातफेरे अन्…; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराने खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ, घेतले हटके उखाणे

नीता अंबानी व दिलजीत दोसांझमधील मजेशीर संवादाचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नीता अंबानींनी गायकाची गुजरातीत शाळा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी “केम छो?” असा प्रश्न विचारल्यावर दिलजीत “मजा मा” असं उत्तर देतो. पुढे, नीता अंबानी त्याला गुजराती भाषेत पुढचा प्रश्न विचारतात. मात्र, हा प्रश्न गायकाला समजत नाही.

हेही वाचा : Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

दिलजीतला प्रश्न समजला नसल्याने नीता अंबानी इंग्रजीत त्याला “तू कुठे राहतोस?” असं विचारतात. यावर गायक “मी लोकांच्या हृदयात राहतो” असं उत्तर देतो. दिलजीतचं हे भन्नाट उत्तर ऐकून नीता अंबानींसह सगळेच भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दिलजीत दोसांझच्या गाण्यावर शाहरुख खान, करीना कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली नंदा, सुहाना खान, सैफ अली खानसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी एकत्र थिरकल्याचं पाहायला मिळालं. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani pre wedding celebration nita ambani asked diljit dosanjh question in gujarati watch video sva 00
First published on: 04-03-2024 at 11:07 IST