AR Rahman Bassist Mohini Dey : प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखी एका कलाकारानं वैवाहिक जीवनातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. ए. आर. रेहमान यांना संगीतात बासवादक म्हणून साथ देणाऱ्या मोहिनी डे हिनेही तिच्या पतीपासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे. एकत्र काम करणाऱ्या या दोन कलाकारांनी एकापाठोपाठ असे निर्णय घेतल्यानं सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बासवादक मोहिनी डे आणि तिचा पती दोघांनीही एकत्रितपणे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करीत घटस्फोटाची घोषणा केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, हे सांगताना फार वेदना होत आहेत की, मार्क आणि मी आमच्या वौवाहिक जीवनातून वेगळे होत आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता लंडनमध्ये! तिकीट कधी अन् कुठे बुक करायचं?

आपल्या पोस्टमध्ये मोहिनीनं पुढे लिहिलं, “आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्हाला दोघांनादेखील जीवनात वेगवेगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्ही एकमेकांपासून वेगळे होणं हा सर्वोत्तम मार्ग स्वीकारत आहोत.”

मोहिनीचा पती मार्कदेखील संगीत विश्वात कार्यरत असून, तो एक संगीत दिग्दर्शक आहे. मोहिनी आणि मार्क यांनी एकत्र अनेक प्रोजेक्टसाठी कामं केली आहेत. त्यामुळे आपल्या पोस्टमध्ये मोहिनीने पुढे लिहिलं आहे, “आम्ही अजूनही अनेक प्रकल्पांसाठी एकत्र काम करणार आहोत. एकत्र केलेल्या कामांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आमचं हे काम लवकर थांबणार नाही.”

“जगातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं प्रेम मिळावं, असं आम्हाला वाटतं. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक विचार करावा. तसेच सर्व जण याचा आदर करतील, अशी आशा आहे.” असं तिनं पोस्टमध्ये शेवटी लिहिलं आहे.

प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांनीदेखील काल त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याचं सांगितलं. १९९५ मध्ये या दोघांचा निकाह झाला होता. त्यानंतर २९ वर्षं या दोघांनी एकत्र संसार केला. अशात आता दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे.

हेही वाचा : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने भाड्याने दिलं आपलं आलिशान घर, एका महिन्याचं भाडं तब्बल…; किंमत ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायरा बानू व ए. आर. रेहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत एका निवेदनातून ही माहिती दिली. निवेदनात त्यांनी म्हटलं, “लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर श्रीमती सायरा यांनी पती ए. आर. रेहमानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या नात्यात भावनिक तणाव आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, नात्यात भरपूर तणाव आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि या अडचणी दूर होणं फार कठीण आहे, असे सायरा यांनी सांगितलं आहे. या कठीण काळात समजदारपणा दाखवून सर्वांनी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती सायरा यांनी सर्वांना केली आहे.”