बॉलिवूड गायक अरिजित सिंहचा आज वाढदिवस आहे. मधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अरिजित सिंहची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. ‘अगर तुम साथ हो’, ‘समझावा’, ‘कबिरा’, ‘तुम ही हो’, ‘फिर भी तुमको चाहुंगा’ अरिजितची ही गाणी लोकप्रिय आहेत.

आवाजाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अरिजितचा चाहता वर्गही मोठा आहे. अरिजितच्या कॉन्सर्टलाही हजारो चाहते उपस्थित असतात. अरिजित सिंहला लाइव्ह ऐकण्यासाठी चाहते गर्दी करतात. अरिजित सिंह कॉन्सर्टमध्ये एक गाणं गाण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये घेतो. तर एका कॉन्सर्टसाठी अरिजित एक ते दीड कोटी रुपये आकारतो.

Watermelon Viral Video
उन्हाळ्यात टरबूज विक्रीसाठी व्यक्तीने लढविली अनोखी शक्कल; Video पाहून स्विगी म्हणाली, “मी फक्त…”
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
a pineapple seller hairstyle look like a pineapple
तरुणाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी! केली चक्क अननसाची हेअरस्टाईल, अननस विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
viral video man stole iphone 13 from the bank in a moment
VIDEO: स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला आयफोन; बँकेत खातं उघडायला आला अन् चोरी तरुन गेला

हेही वाचा>> लग्नाच्या सहा वर्षांनी पतीपासून विभक्त झाली ‘तांडव’ फेम अभिनेत्री; ४ वर्षांनंतर खुलासा करत म्हणाली, “पीडितेसारखं…”

अरिजित सिंह लक्झरियस आयुष्य जगतो. मुंबईत त्याचं आलिशान घर आहे. त्याची किंमत सुमारे आठ कोटी रुपये इतकी आहे. अरिजित गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. अरिजितकडे मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर या गाड्या आहेत.

हेही वाचा>> ७ कोटींचे दोन फ्लॅट बहिणीला गिफ्ट केल्यानंतर आलिया भट्टने स्वत:साठी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत जाणून अवाक् व्हाल

सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अरिजित सिंह कोट्यधीश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजित सिंहकडे एकूण ७ मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. भारतीय रुपयानुसार, अरिजित सिंह ५५ कोटींचा मालक आहे.