Premium

“तुझी नेहमी आठवण येत राहील”; अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

अर्जुन कपूरची बहीण नशुलानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

arjun kapoor
अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन

बॉलीवूड अभिनेता अर्जून कपूरच्या पाळीव श्वानाच निधन झालं आहे. मॅक्सीमस असं त्या पाळीव श्वानाचं नाव आहे. श्वानाच्या आठवणीत अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने मॅक्सीमसबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याच्याबरोबर खेळतानाचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लग्नाच्या तारखेच्या बातमीबद्दल आमिर खानची लेक आयरा खानचा मोठा खुलासा; म्हणाली…

अर्जूनने पोस्ट करत लिहिलं आहे. “जगातील सगळ्यात चांगला मुलगा. दयाळू, धाडसी, गोड मॅक्सीमस तुझ्याशिवाय हे घर पहिल्यासारख वाटणार नाही. तुझ्याशिवाय मी घरात एकटा कसा राहणार मला माहिती नाही. मला तुझी नेहमी आठवण येत राहील.” अर्जुनची बहीण अनशुलानेही मॅक्सीमसच्या आठवणीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अनशुलाने पोस्ट करत लिहिलं आहे. “चांगल्या आणि वाईट वेळेत आमच्यावर विनाअट प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्याशिवाय हे घर नेहमीप्रमाणे वाटणार नाही.”

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपच चर्चांना उधाण आले आहे. अर्जून अभिनेत्री कुशा कपिल डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. कुशामुळेचे अर्जुन आणि नातं संपुष्टात आलं अशाही चर्चा आहेत. यामुळे कुशा कपिलला ट्रोलही केलं गेलं होतं. ट्रोलिंग झाल्यानंतर कुशाने अर्जुन आणि मी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं आहे. या अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Video: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील डिलीट केलेला सीन व्हायरल, आलिया-रणवीरचा ‘हा’ अंदाज पाहिलात का?

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास अर्जुन लवकरच भूमी पेडणेकरबरोबर नुआ शैलीच्या थ्रिलर ‘द लेडीकिलर’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगसोबत एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arjun kapoor share emotional note on demise of his pet dog maximus dpj

First published on: 14-09-2023 at 20:14 IST
Next Story
लग्नाच्या तारखेच्या बातमीबद्दल आमिर खानची लेक आयरा खानचा मोठा खुलासा; म्हणाली…