बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोवरला १२ नोव्हेंबरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या लेकीचं नाव देवी असं ठेवलं आहे. करण व बिपाशाची मुलगी कशी दिसते, हे पाहण्यासाठी चाहते आतुर होते. बिपाशाने पहिल्यांदाच तिच्या लेकीचे फोटो शेअर केले आहेत.

बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पाच महिन्यांच्या लेकीचे फोटो खास चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा व करणची लेक देवीचा गोंडस चेहरा पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाचा फ्रॉक व हेअरबँड लावून बिपाशाच्या लेकीने गोड स्माइल दिल्याचं फोटोत दिसत आहे. तिच्या स्मितहास्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांचा पद्मश्रीने गौरव, पाहा व्हिडीओ

लेकीचे फोटो शेअर करत बिपाशाने “हॅलो वर्ल्ड, मी देवी” असं कॅप्शन दिलं आहे. देवीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर कमेंट करत बिपाशा व करणचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा>> काजोल देवगणने शेअर केलेल्या लेक न्यासाच्या फोटोंवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची कमेंट, म्हणाल्या “काजोल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिपाशा व करणने २०१६मध्ये लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर ते आईबाबा झाले. करणचं बिपाशाबरोबरचं हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. एक वर्ष डेट केल्यानंतर करण व बिपाशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.