बी-टाउनमध्ये सध्या अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तिची मेहेंदी आणि हळद सेरेमनी पार पडली. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी सोहेल खानच्या घरी आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पोहोचलेल्या कलाकारांनी मीडियाला पोज दिल्या होत्या.

सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? अनन्या पांडेचे काका आणि सलमानच्या भावाचं नातं काय?

अभिनेता बॉबी देओलनेही या मेहेंदी सेरेमनीला हजेरी लावली. यावेळी तो पत्नी तान्या देओलबरोबर पोहोचला होता. पारंपारिक ऑफ व्हाइट पोशाखात तान्या देओल खूपच सुंदर दिसत होती. तर, बॉबी मात्र टी-शर्ट घालून तिथे पोहोचला होता. त्याचे वाढलेले केस, दाढी, ब्लू टी शर्ट व ब्लॅक पँटवाल्या लूकमुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. अशा अवतारात मेहेंदी सेरेमनीला कोण जातं? असंही नेटकरी म्हणाले आहेत.

‘हा थेट जंगलातून इथे फंक्शनमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे त्याला कुणीही काही म्हणू नका,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

bobby
नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

‘बॉबी देओल चांगले ड्रेस का घालत नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. तो इतका स्टायलिश होता, स्टाइल आयकॉन होता, हे खूप विचित्र आहे,’ असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

bobby
नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

‘तो आताच झोपेतून उठलाय, असं दिसतंय’ अशी कमेंट युजरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
bobby
नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, अलाना पांडे तिचा परदेशी प्रियकर आयव्हरबरोबर आज लग्नबंधनात अडकणार आहे. ती अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे.