scorecardresearch

भर कार्यक्रमात कचरा उचलताना दिसला रणवीर सिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंगसाठी…”

मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचलेला रणवीर सिंग जमिनीवर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Ranveer singh
रणवीर सिंह (छायाचित्र इंडिय एक्सप्रेस)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अनेकदा आपल्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या कपड्यामुळे तर कधी त्याच्या कृतीमुळे तो लोकांना आश्चर्यचकित करत असतो. मात्र, यंदा तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरसिंगचा एका उद्धाटनाच्या कार्यक्रम्यादरम्यान एक अशी कृती केली, ज्यावरुन चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करायला सुरुवात केली आहे. रणवीरचा हा व्हिडओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओमध्ये नेमक काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा- ‘पाकिस्तावरील तुझं प्रेम…’; रिसेप्शनमध्ये सीमेपलीकडून आलेला लेहेंगा परिधान केल्याने स्वरा भास्कर ट्रोल

रणवीर सिंग काल एका सलूनच्या उद्धाटनाला पोहोचला होता. यावेळी त्याने राखाडी रंगाची पँट आणि काळ्या टी-शर्ट परिधान केला होता. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा होता. रणवीर सिंग पापाराझीसमोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर काही कचरा दिसला. त्यानंतर रणवीरने खाली वाकून हा कचरा उचलला आणि पुढे गेल्याचे व्हिडओत दिसत आहे. व्हायरल भयानी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा- सारा अली खानच्या ब्रेकअपवर आई अमृता सिंहने ‘या’ दोन शब्दांत दिलेली प्रतिक्रिया; अभिनेत्रीनेच केला खुलासा

रणवीरच्या फोटोवर चाहत्यांची प्रतिक्रिया

रणवीरच्या कचरा गोळा करण्याच्या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, “भारतातील रस्त्यांवर खूप कचरा आहे. तो कधीच उचलला गेला नाही. समोर मीडियाचे लोक आहेत म्हणून हा स्टंट करत आहे. हे खूप चुकीचे आहे, असे एकाने लिहिले आहे.
एका यूजरने लिहिले, “ओव्हरअॅक्टिंगसाठी ५० रुपये कापले.” व्हिडिओ पाहून एकाने दीपिकाचा उल्लेख केला आहे. युजर म्हणाला, “दीपिका पदुकोणाला स्वच्छता खूप आवडते. तिने अनेकवेळा याबाबत खुलासा केला आहे की ती तिचे घर खूप स्वच्छ ठेवते. आता कदाचित हा तिच्या जीवनशैलीचा भाग झाला असेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 14:31 IST

संबंधित बातम्या