scorecardresearch

गौरी खानने शेअर केला फॅमिलीचा लेटेस्ट फोटो; म्हणाली, “कुटुंब ते जे..”

गौरी खानने सोशल मीडियावर फॅमिलीचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत

shaharukh khan family
गौरी खानने शेअर केला फॅमिलीचा लेटेस्ट फोटो

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानसोबतच त्याची लेडी लव्ह बायको गौरी खानही नेहमी चर्चेत असते. शाहरुख खान आणि गौरी खान यांची गणना आदर्श कुटुंबात केली जाते. गौरी प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. जेव्हा जेव्हा दोघे पार्टी किंवा कार्यक्रमात एकत्र दिसतात तेव्हा ते दोघे सगळ्यांच लक्ष वेधून घेतात. नुकताच गौरी खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्लासी पोज देताना दिसत आहे.

हेही वाचा- Video: “तू असं करायला नको होतंस…” लहान मुलीशी केलेल्या ‘त्या’ वागणुकीमुळे तब्बूवर नेटकरी नाराज

रविवारी गौरी खानने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवीन फोटो शेअर केला. गौरीचा हा फोटो फॅमिली फोटो आहे. ज्यामध्ये तिचा नवरा आणि बॉलीवूडचा मेगा-सुपरस्टार शाहरुख खान, मुलगी सुहाना खान, मोठा मुलगा आर्यन खान आणि लहान अबराम खान टशनमध्ये दिसत आहेत. सगळ्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खान ब्लॅक टी-शर्टसोबत ब्लॅक जीन्स घातली आहे, तर सुहाना खान ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशनमध्ये जंपसूट घातलेली दिसत आहे. तर गौरीने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. आर्यन आणि अबरामनेही काळ्या रंगाचा टीशर्ट, जीन्स आणि जॅकेट घातले आहेत.

हेही वाचा- विकेंड साजरा करताना प्रियांका आणि निकची झाली होती ‘अशी’ अवस्था; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “जेव्हा आई-बाबा..”

हा फोटो खुद्द गौरी खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले ‘कुटुंब तेच आहे जो घर बनवतो… उत्साही… कॉफी टेबल बुक… लवकरच येत आहे.’ गौरी खान काहीतरी नवीन आणि रोमांचक घेऊन येणार आहे, हे या फोटोवरून आणि त्याच्या कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे. पण चाहत्यांना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर कमेंट करताना अभिनेत्री करिश्मा कपूरने हार्ट आयकॉन शेअर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 09:45 IST

संबंधित बातम्या