'मर्डर मुबारक' या चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सारा नेहमी तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच सध्या साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. अभिनेत्री सारा अली खानचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर 'विरल भयानी' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सारा भाजलेल्या जखमेसह आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसत आहे. ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. यावेळी तिने पोटावर भाजलेल्या जखमेचा मेकअप न करताना, ती जखम फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. हेही वाचा - आदेश बांदेकरांना आहे लेकाच्या लग्नाची घाई, सुचित्रा बांदेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाल्या, “हा मुंडावळ्या घेऊन…” साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिचं कौतुक करत आहे. 'शेरनी', 'क्यूट लूक' अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दरम्यान, साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'मर्डर मुबारक'नंतर २१ मार्चला ओटीटीवर तिचा 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात साराने उषा मेहता यांची भूमिका निभावली आहे. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सारासह अभिनेता इमरान हाश्मी पाहायला मिळणार आहे.