बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. अनुराग सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतो. नुकतंच त्याने अभिनेता अभिषेक बच्चनवर भाष्य केलं आहे.
‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीचे अनुराग कश्यपने दिले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चनदेखील होता. मात्र याआधीदेखील अनुरागने अभिषेकबरोबर काम केलं होतं. त्याच्या मते अभिषेक गांभीर्याने काम करत नव्हता. मी आणि अभिषेकने ‘युवा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे संवाद मी लिहिले आहेत. माझ्या भावानेही त्या चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाच्या डबिंगवरही आम्ही अभिषेकसोबत खूप काम केल केले होते.”
Video : धाकट्या लेकाचं करीना कपूरला कौतुक; वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
तो पुढे म्हणाला “काळानुसार माणसे परिपक्व होतात. अभिषेकही झाला. सुरुवातीच्या काळातील अभिषेक बच्चन आणि ज्यांच्यासोबत मी ‘मनमर्जियां’मध्ये काम केले होते, दोघेही पूर्णपणे वेगळे होतेअभिषेक खूप मेहनती माणूस आहे. तो सुसंस्कृत आहे. त्याला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. पण, सुरुवातीला अभिषेकचे वागणे अतिशय उद्धट होते. प्रत्येक गोष्टीला गांभीर्याने न घेता त्याची खिल्ली उडवायचा.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
अनुरागचा नुकताच ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच विकी कौशलदेखील या चित्रपटात झळकला आहे.