मुकेश यांचा आवाज अशी ओळख मिळालेले गायक कमलेश अवस्थी यांचं अहमदाबादमध्ये निधन झालं आहे. मागच्या एक महिन्यापासून ते कोमामध्ये होतो. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ‘गोपीचंद जासूस’ या सिनेमात कमलेश अवस्थी यांनी राज कपूर यांच्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. ‘तेरा साथ है तो..’, ‘जिंदगी इम्तिहान लेती है..’ ही त्यांची गाणी विशेष गाजली. कमलेश अवस्थी यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

कमलेश अवस्थी यांचा अल्प परिचय

कमलेश अवस्थी यांचा जन्म १९४५ मध्ये सावरकुंडला या ठिकाणी झाला होता. त्यांनी भावनगर विद्यापीठातून पीएचडी केली. भावनगर येथून त्यांनी कला गुरु भरभाई पंड्या यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीत करिअर सुरु केलं. संगीत क्षेत्रात त्यांनी पहिला अल्बम ‘ट्रिब्यूट टू मुकेश’ आणला. कमलेश अवस्थी यांनी हिंदी आणि गुजराती सिनेमांसाठी गायन केलं. त्यामुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले. मुकेश यांच्या आवाजाची झलक त्यांच्या आवाजात जाणवत असे. ‘अमर उजाला’ने हे वृत्त दिलं आहे.

govinda attended niece Arti singh wedding
Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…
a woman met her friend after 15 years emotional moment
Video : तब्बल १५ वर्षानंतर भेटली मैत्रीणीला! पाहा तो सुंदर क्षण, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे मित्र- मैत्रीणी
rohit sharma gets emotional as he opens up on 2023
Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…”
marathi actor Shashank Ketkar After many months, went to Pune home with his wife and son video viral
Video: बऱ्याच महिन्यांनी शशांक केतकर पत्नी व मुलासह गेला पुण्याच्या घरी, मारला सालपापडीवर ताव; पाहा व्हिडीओ

व्हॉईस ऑफ मुकेश ही ओळख कशी मिळाली?

राज कपूर यांच्या गोपीचंद जासूस या सिनेमासाठी त्यांनी पार्श्वगायक म्हणून गाणी म्हटली होती. देशाला मुकेश परत मिळाला आहे असं राज कपूर तेव्हा म्हणाले होते. राज कपूर यांनी कौतुक केल्यापासून व्हॉईस ऑफ मुकेश हीच ओळख त्यांना मिळाली होती. गुजराती गायन क्षेत्रात त्यांचा मोठा लौकिक होता. कमलेश अवस्थी यांनी अनेक गुजराती गाणी म्हटली होती. तसंच ते स्टेज शोजही करत. आज हा हरहुन्नरी गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे.