मुकेश यांचा आवाज अशी ओळख मिळालेले गायक कमलेश अवस्थी यांचं अहमदाबादमध्ये निधन झालं आहे. मागच्या एक महिन्यापासून ते कोमामध्ये होतो. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ‘गोपीचंद जासूस’ या सिनेमात कमलेश अवस्थी यांनी राज कपूर यांच्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. ‘तेरा साथ है तो..’, ‘जिंदगी इम्तिहान लेती है..’ ही त्यांची गाणी विशेष गाजली. कमलेश अवस्थी यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

कमलेश अवस्थी यांचा अल्प परिचय

कमलेश अवस्थी यांचा जन्म १९४५ मध्ये सावरकुंडला या ठिकाणी झाला होता. त्यांनी भावनगर विद्यापीठातून पीएचडी केली. भावनगर येथून त्यांनी कला गुरु भरभाई पंड्या यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीत करिअर सुरु केलं. संगीत क्षेत्रात त्यांनी पहिला अल्बम ‘ट्रिब्यूट टू मुकेश’ आणला. कमलेश अवस्थी यांनी हिंदी आणि गुजराती सिनेमांसाठी गायन केलं. त्यामुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले. मुकेश यांच्या आवाजाची झलक त्यांच्या आवाजात जाणवत असे. ‘अमर उजाला’ने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood singer kamlesh awasthi death voice of mukesh passed away on 28th march at ahmedabad scj
First published on: 28-03-2024 at 23:22 IST