बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या त्याला ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी रणवीरने अॅस्टन मार्टिन नावाची कार खरेदी केली होती. मुंबई विमानतळावरील त्याचा या कार्डबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्या गाडीचा विमा (Insurecnce) दोन वर्षांपूर्वी संपला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी, असा दावा अनेक नेटकरी करत होते. पण आता या मागचे सत्य समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीरच्या ऍस्टन मार्टिन या गाडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत होता. यावेळी तो ४ कोटींची निळ्या रंगाची गाडी चालवताना दिसला होता. या व्हिडीओत या गाडीचा संपूर्ण नंबरही दिसत होता. त्या नंबरवरुन एका नेटकऱ्याने त्या गाडीची माहिती काढली होती. त्यावेळी त्या गाडीचा विमा दोन वर्षांपूर्वी संपला असल्याचे समोर आले होते.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल…

त्या नेटकऱ्याच्या दाव्यानुसार रणवीरच्या या गाडीचा विमा हा २८ जून २०२० रोजी संपला आहे. त्यामुळे त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई केली जावी, असे म्हटले जात होते. पण नुकतंच ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : “एक दाढीवाला बाबा येऊन त्या…” ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’मध्ये भारत पाकिस्तान, नेपाळच्याही मागे पाहून मराठी अभिनेता संतापला

याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या या कारचा विमा अद्याप संपलेला नाही. या गाडीचा विमा २ जुलै २०२२ रोजी काढण्यात आला होता. त्याची मुदत १ जुलै २०२३ पर्यंत आहे. त्यामुळे रणवीरच्या या गाडीचा विमा संपलेला असेल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. त्याने कोणत्याही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे.

रणवीर लवकरच अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी, प्रिती झिंटा आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. करण जोहर, हिरू जोहर आणि अपूर्व मेहता दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच रणवीर सिंह रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटातही दिसणार आहे.