जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘आरआरआर’ हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तो जपानमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. काही दिवसांपूर्वी राजामौली, ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण त्यांच्या या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी तेथे पोहोचले होते. त्यांची भेट घेण्यासाठी अनेक जपानी चाहत्यांनी त्यांच्या हॉटेलखाली गर्दी केली होती. या चित्रपटाच्या टीमच्या जपान भेटीमधले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या बिगबजेट चित्रपटाला जगभरातल्या सिनेरसिकांनी पसंती दाखवली आहे. अमेरिका, चीन, युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स देश आणि आता जपान अशा देशांमध्ये चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. दरम्यान एका पाकिस्तानी चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजने या चित्रपटाचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – काश्मीरमध्ये अनुपम खेर आईसाठी घर विकत घेणार, लेकाने वचन देताच दुलारी झाल्या भावूक

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने २०१४ मध्ये ‘खूबसुरत’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पुढे तो ‘कपूर अ‍ॅन्ड सन्स’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये झळकला. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘द लेजेंड ऑफ मौला जाट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये चांगली कमाई करत आहे. पाकिस्तानबाहेर सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “नवा दिवस, नवा विक्रम! द लेजेंड ऑफ मौला जाटने २०२२ मध्ये सर्वाधित कमाई करणाऱ्या आरआरआर या चित्रपटाला ब्रिटनमध्ये पछाडले आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – Video: प्रमोशनदरम्यान कतरिना कैफ ‘हाऊ इज द जोश’ म्हणाली अन्…; व्हायरल व्हिडीओ पाहा

‘आरआरआर’शी तुलना केल्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांनी या पोस्टखाली कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. एका यूजरने “आरआरआरने जगभरामध्ये ११४४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर मौला जाटने फक्त १२७ कोटींची कमाई केली आहे. तुलना करायचीच असेल, तर नीट करा ना; फक्त ब्रिटनमधल्या कलेक्शनच्या आकड्यांचा उल्लेख कशाला हवाय” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fawad khans the legend of maula jatt beats rrr watch instagram post yps
First published on: 31-10-2022 at 12:11 IST