आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशजनक कामगिरी केली होती. खरंतर, आमिरला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अशा दमदार अभिनेत्याचे सलग चित्रपट फ्लॉप होणं हे आमिरसह त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर त्याने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं. परंतु, आता लवकरच आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांसह चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

आमिर बहुचर्चित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ‘कॅम्पिओन्स’चा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटासाठी आमिरने सर्वात आधी फरहान अख्तरला नायकाच्या भूमिकेसाठी ऑफर दिली होती पण, त्यानंतर अभिनेत्याने ही भूमिका स्वत: साकारण्याचा निर्णय घेतला. ‘सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केलं आहे. आता या चित्रपटात झळकणाऱ्या नायिकेचं नावंही समोर आलं आहे.

हेही वाचा : “गोळ्या झाडायच्या, लाठीचा वापर…”, निखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर किरण मानेंसह मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाले…

पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री जिनिलीया देशमुखने आमिर खानचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ साइन केला आहे. याशिवाय अभिनेत्रीने यासंदर्भात माहिती देणारी एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसची बॉटल पाहायला मिळत आहे. या फोटोला जिनिलीयाने “१६ वर्षांनंतर…” असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी अभिनेत्रीने आमिरची निर्मिती असलेल्या ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटासाठी काम केलं होतं. यामध्ये अभिनेत्याचा भाचा इम्रान खानने प्रमुख भूमिका साकारली होती.

हेही वाचा : “बाळंतपण नैसर्गिक की सिझेरियन?”, चाहतीच्या प्रश्नावर सई लोकूर म्हणाली, “स्त्रीरोगतज्ज्ञ अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
genelia
जिनिलीया देशमुखची स्टोरी

दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिर खान, जिनिलीया देशमुखसह ‘तारे जमीन पर’ फेम दर्शील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आता आमिर या चित्रपटासंदर्भात पुढील अपडेट्स केव्हा देणार याबाबत त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.