ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे फैज महोत्सवात गेल्यानंतर दहशतवादाबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याबाबत त्यांनी तिथे भाष्य केलं होतं. मुंबईवर हल्ला करणारे लोक तुमच्या देशात मोकळे फिरत आहेत आणि हे वास्तव आहे, असं जावेद अख्तर म्हणाले होते. त्यानंतर भारतीयांनी त्यांनी तिथे जाऊन पाकिस्तानला आरसा दाखवला याबदद्ल कौतुक केलं होतं, तर पाकिस्तानचे लोक मात्र संतापले होते. या वक्तव्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबदद्ल पहिल्यांदाच जावेद अख्तर व्यक्त झाले आहेत.

“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान

पाकिस्तानात त्यांनी केलेलं विधान इतकं मोठं होईल, हे त्यांना माहीत नव्हतं. पण तिथे जाऊन गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या हे आधीच निश्चित केलं होतं आणि तेच तिथे जाऊन केलं, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. “मी विधान केलं असलं, तरी माझा मुद्दा स्पष्टपणे सांगण्यापासून मी कधीच मागे हटलो नाही. हे प्रकरण खूप मोठं झालं आहे. मला तर संकोच वाटू लागला आहे. मला वाटतं आता त्याबद्दल अधिक काही बोलू नये. जेव्हा मी भारतात परतलो तेव्हा मला वाटले की मी तिसरं महायुद्ध जिंकलं आहे. या विधानावर मीडिया आणि लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया आल्या की मी फोन घेणे बंद केलं. खरं तर मी काय मोठं काम केलंय, असा विचार मी केला. मला या गोष्टी सांगायच्या होत्या. आपण गप्प का बसावं? नाही का,” असं जावेद अख्तर म्हणाले.

जावेद अख्तरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर व्हिडीओ शेअर करणाऱ्या अली जफरवर संतापले पाकिस्तानी; अभिनेता म्हणाला, “दहशतवादामुळे आपण…”

पुढे त्यांनी ते भारतात करत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला. “माझ्या या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहं, असं मला आता दिसून येत आहे. तिथे लोक मला शिव्या देत आहेत. मला व्हिसा का दिला? असं विचारत आहेत. तो कोणत्या प्रकारचा देश आहे, हे आता मला कायम लक्षात राहील. ज्या देशात माझा जन्म झाला, त्या देशात मी काही ना काही वादग्रस्त विधानं करत आलो आहे. होय, तोच देश, जिथे मी मरणार देखील आहे. मग अशा परिस्थितीत घाबरण्यासारखं काय आहे? मी इथं भीतीने जगत नसताना मला तिथल्या गोष्टींची भीती का वाटावी?” असा सवाल जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.

“किती लाजिरवाणी गोष्ट आहे” स्वतःच्याच देशातील लोकांवर संतापली पाकिस्तानी अभिनेत्री; जावेद अख्तरनाही टोला लगावत म्हणाली…

आपला देश पाकिस्तानातील कलाकारांचे ज्या प्रकारे स्वागत करतो, त्याच पद्धतीने भारतीय कलाकारांचे पाकिस्तानात स्वागत होत नाही, असंही जावेद अख्तर म्हणाले. “मी पाकिस्तानात होतो तेव्हा एका मोठ्या सभागृहात प्रश्नोत्तरे होत होती. प्रत्येकजण मला खूप मैत्रीपूर्ण प्रश्न विचारत होता. सर्व काही ठीक चाललं होतं, मग एका व्यक्तीने विचारलं की आम्ही तुमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने भेटतो, पण तुमच्या बाजूने ती आत्मीयता जाणवत नाही. या प्रश्नानंतर लगेच ते सभागृह सोडणं माझ्यासाठी शक्य नव्हते म्हणून मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी त्यांना अगदी आरामात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी एवढंच म्हणालो की तुम्ही लोक तुमचा रेकॉर्ड व्यवस्थित सेट करा, सर्व काही ठीक होईल,” असं जावेद अख्तर त्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं होतं, ते सांगताना म्हणाले.