अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्री-वेडिंगसाठी संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व जामनगरमध्ये अवतल्याचं पाहायला मिळालं. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतपासून शाहरुख, सलमान, आमिर, दीपिका असे सगळेजण बडे स्टार्स प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला पोहोचले होते. परंतु, बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौत या प्री-वेडिंगला गैरहजर होती.

कंगणा रणौत कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कलाविश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती नेहमीच स्वत:चं स्पष्ट मत मांडत असते. भारतरत्न दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी “तुम्ही मला ५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही” असं उत्तर देत लग्नात गाण्यास नकार दिला होता. ही दीदींबद्दलची खास आठवण आशा भोसलेंनी ‘डीआयडी लिटील मास्टर्स ५’ या कार्यक्रमात सांगितली होती. यासंदर्भातील स्क्रीनशॉट शेअर करत कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात…

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ektaa Kapoor refutes Smriti Irani claim
“हे खोटं आहे”, एकता कपूरने फेटाळला स्मृती इराणींचा ‘तो’ दावा; म्हणाली, “एका सेकंदात…”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

हेही वाचा : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला मैत्रिणीच्या घरी चोरी केल्याप्रकरणी अटक, तब्बल १५० तोळे सोनं लंपास केल्याचा आरोप

कंगना या पोस्टमध्ये लिहिते, “आयुष्यात मी अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना केला आहे. परंतु, लताजी आणि मी आम्ही दोघीच केवळ अशा आहोत ज्यांची गाणी खूप हिट झाली आहेत. ( फॅशन का जलवा, घनी बावली हो गयी, लंडन ठुमकदा, साडी गली, विजयी भव ) आम्ही देखील लोकप्रिय आहोत, पण कोणीही कितीही आमिष दाखवलं तरीही, आजवर मी कोणाच्याही लग्नात कधीच नाचले नाही.”

हेही वाचा : “राजकारणात गेलो तर दुसऱ्या दिवशी…”, शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “कोणतं सरकार…”

kangana
कंगना रणौतची पोस्ट

“बॉलीवूडची अनेक सुपरहिट आयटम साँग देखील मला ऑफर करण्यात आली होती. हळुहळू मी पुरस्कार सोहळ्यांपासून सुद्धा दूर झाले. लोकप्रियता आणि पैशाला नकार देण्यासाठी तुमच्यामध्ये खूप हिंमत असणं आवश्यक असतं. आजकालच्या शॉर्टकटच्या युगात तरुण पिढीने पैसा म्हणजे सर्वकाही नाही… हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण, तुमच्यातील इमानदारपणा हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे.” अशी पोस्ट कंगनाने लिहिली आहे.