कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ती चित्रपटसृष्टीतील घराणेशाही व इतर मुद्द्यांवर तिची परखड मतं मांडत असते. अशातच तिने आपल्याला पुरुष कलाकारांइतकं मानधन मिळत असल्याचा दावा केला आहे. तिने प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमध्ये कधीच पुरुष कलाकारांइतकं मानधन मिळालं नाही, असं प्रियांकाने म्हटलं होतं.

“तो पळून…”, मृणाल ठाकुरने एक्स बॉयफ्रेंडबद्दल केलेला खुलासा

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

प्रियांका चोप्रा नेमकं काय म्हणाली होती?

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्रा म्हणाली होती, “बॉलिवूडमध्ये मला कधीच पुरुष कलाकारांइतकं वेतन मिळालं नाही. मी तिथे जवळपास ६० चित्रपट केले आहेत, पण मला माझ्या पुरुष सहकलाकारांएवढं मानधन कधीच मिळालं नाही. मला माझ्या पुरुष सहकलाकाराच्या १० टक्के मानधन मिळेल. ही पगारातील तफावत खूप मोठी आहे आणि अजूनही बर्‍याच अभिनेत्रींना याचा सामना करावा लागतो.”

कंगना राणौतने काय म्हटलंय?

प्रियांकाचा व्हिडीओ पोस्ट करत कंगना म्हणाली, “हे खरं आहे की माझ्या आधीच्या महिलांनी (अभिनेत्रींनी) या पितृसत्ताक नियमांचे पालन केले होते. वेतनाच्या समानतेसाठी लढणारी मी पहिलीच होती आणि हे करताना मला खूप वाईट अनुभव आले. बऱ्याच लोकांनी मला ज्या भूमिकांसाठी मी जास्त मानधन मागत होते, त्याच भूमिका विनामूल्य करण्याची ऑफर दिली.”

kangana story
कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

“मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की बहुतेक ए-लिस्टर्स अभिनेत्री मानधन न घेता चित्रपट करतात, शिवाय त्या निर्माते इतर मागणी करत असतील तर तडजोडीही करतात. कारण त्यांना भीती वाटते की भूमिका योग्य लोकांकडे जातील आणि नंतर चतुराईने त्यांना सर्वाधिक मानधन मिळत असल्याचे लेख प्रकाशित करतात. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला माहित आहे की फक्त मलाच पुरुष कलाकारांइतकं मानधन मिळतं आणि इतर कोणालाही नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडे दोष देण्यासाठी इतर कोणी नाही,” असंही कंगना रणौत म्हणाली.