‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री अवनीत कौरबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. आधी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता परंतु, काही कारणास्तव आता हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (१४ जून) या चित्रपटाचा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला.

‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान कंगना, नवाजुद्दिन आणि अवनीत या तिघांनी उपस्थिती लावली अन् चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या आठवणी आणि अनुभव लोकांसमोर शेअर केले. याच इव्हेंटदरम्यान कंगनाने या चित्रपटाबद्दल आणि दिवंगत अभिनेता इरफान खानशी असलेल्या कनेक्शनबद्दल खुलासा केला.

Sonakshi praised director Aditya Sarpotdar
सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
Zombivli, Sonakshi Sinha, sonakshi sinha new movie,
सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
biopic, Laxman Utekar, Vicky Kaushal,
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावरच चरित्रपट होऊ शकतो – विकी कौशल
Sanjeev Kumar
संजीव कुमार : स्वत:च्या मृत्यूचे भाकीत करणारा अभिनेता; जास्त वयाच्या भूमिका करण्याचे होते वेड
Shahrukh Khan
“शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये माझ्या भूमिकेची नक्कल केली”, पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
Kalki 2898AD
‘कल्की 2898 एडी’च्या दिग्दर्शकाचा प्रेक्षकांना सुखद धक्का; प्रभास, बिग बींसह दिसला ‘हा’ सुपरस्टार
Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता

आणखी वाचा : “मंदिरातील देवाला, चर्चमधील येशूला आणि दर्ग्यातील अल्लाहला…” संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

याबद्दल बोलताना कंगना म्हणाली, “हा चित्रपट माझ्यासाठी डेब्यूसारखाच आहे, शिवाय हा चित्रपट करण्यामागील एक खास कारण आहे, जे मी आजवर कोणालाच सांगितलं नाहीये. खरं तर आधीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. तब्बल ६ ते ७ वर्षांपूर्वी मी आणि इरफान सर या चित्रपटावर काम करत होतो. त्या वेळी आम्ही मीडियाला आमंत्रित करून एक मोठा कार्यक्रमही आयोजित केला होता. त्या वेळी या चित्रपटाचे नाव ‘डिव्हाइन लवर्स’ असं होतं. दुर्दैवाने त्यानंतर आमचा दिग्दर्शक आजारी पडला, आम्ही बराच प्रयत्न केला, पण २-३ वर्षं काहीच घडत नसल्याने आम्ही या चित्रपटाचा विचारच सोडून दिला.”

‘टिकू वेड्स शेरू’ हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून टिकू आणि शेरू ही दोन्ही पात्रं एकमेकांपासून खूप वेगळी आहेत, पण दोघांचंही स्वप्न स्टार होण्याचं आहे. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीचा नुकताच आलेला ‘जोगीरा सा रा रा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता पहिल्यांदाच अवनीत कौरबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.