बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर कतरिनाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कतरिनाने २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर कतरिना आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कतरिनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून ती गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.

गुजरातच्या जामनगरमध्ये नुकताच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चंटचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडमधीलही अनेक कलाकार या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये उपस्थित होते. तीन दिवसांच्या या सोहळ्यानंतर बॉलीवूड कलाकार पुन्हा मुंबईला रवाना झाले. जामनगरवरुन मुंबईला परतानाचे बॉलीवूड कलाकारांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतले ते कतरिना कैफ व विकी कौशलने.

हेही वाचा- अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये करीनाच्या नेकलेसची रंगली चर्चा; काय आहे एवढे खास? घ्या जाणून…

जामनगरमधून निघताना कतरिना व विकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी कतरिनाने बेबी पिंक रंगाचा अनारकली कुर्ता परिधान केला होता. व खांद्यापासून पोटापर्यंत ओढणी गुंडाळली होती. तर विकी डेनिम शर्ट व जीन्स लूकमध्ये दिसला. कतरिनाच्या या लूकवरुन ती बेबी बंब लपवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. एवढंच नाही तर मीडियासमोर येताना कतरिनाने पोटावर हाथ ठेवला होता त्यामुळे ती गरदोर असल्याची चर्चाही रंगली आहे.सोशल मीडियावर दोघांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

विकी कौशल व कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.