बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असताना कियाराने गळ्यात परिधान केलेल्या मंगळसूत्रानेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच तिचे हे मंगळसू्त्र कोणी डिझाईन केलं? त्याची किंमत काय? या गोष्टी समोर आल्या आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी जैसलमेरमध्ये सप्तपदी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतील त्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी कियाराच्या विमानतळावरील लूकची फार चर्चा झाली. त्यावेळी तिने गळ्यात परिधान केलेले मंगळसूत्रही पाहायला मिळाले. त्यानंतर दिल्लीतील घरी आल्यानतंर त्यांनी पुन्हा एकदा एकत्र पापाराझींना फोटोसाठी एकत्र पोझ दिली.
आणखी वाचा : Photos : कियारा अडवाणीच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा

यावेळी सिद्धार्थ लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर कियाराने लाल रंगाचा सलवार ड्रेस घातला होता. त्याबरोबर ती नववधूप्रमाणे भांगेत कुंकू, हातात चुडा, अंगठी अशा लूकमध्ये दिसत होती. त्यावेळी कियाराने गळ्यात परिधान केलेल्या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

कियाराने परिधान केलेले मंगळसूत्र अत्यंत नाजूक पण सुंदर आहे. तिने तिचे मंगळसूत्र संपूर्ण सोन्याने बनवलं आहे. त्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि एक डायमंडचं पेंडेंट पाहायला मिळत आहे. सध्याच्या मंगळसूत्राच्या ट्रेंडनुसार तिने हे मंगळसूत्र केलं आहे. तिचे हे मंगळसूत्र प्रसिद्ध डिझाईनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केले आहे.

आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आजतक’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराच्या मंगळसूत्रासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. सिद्धार्थने कियाराच्या या मंगळसूत्रासाठी २ कोटी रुपये खर्च केले आहेत. तिच्या या मंगळसूत्राची किंमत साधारण दोन कोटींच्या आसपास असल्याचे समोर आलं आहे. तर कियाराने लग्नादरम्यान परिधान केलेला लेहंगा हा मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आहे.