कॉंग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हरियाणात पोहोचली आहे. यावेळी राहूल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. “मी राहुल गांधीला मारुन टाकलं आहे”, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्याने ट्वीट केलं आहे.

चित्रपट समीक्षक व बॉलिवूड अभिनेता कमल आर खान(केआरके) ने राहुल गांधींचा उल्लेख करत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद कुमार यांनी “यापेक्षा मूर्खपणाची यात्रा असू शकत नाही”, असं ट्वीट केलं होतं. हे ट्वीट केआरकेने रिट्वीट केलं आहे. “राहुल गांधींना घरी घेऊन जा, अशी मी कॉंग्रेस नेत्यांना विनंती करतो. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”, असं केआरकेने म्हटलं आहे.

हेही वाचा>> “मी राहुल गांधीला मारून टाकलं, फक्त…”, हरियाणातील राहुल गांधींचं विधान चर्चेत

केआरेकेने केलेलं हे ट्वीट चर्चेत आहे. राहुल गांधींनी हरियाणात केलेल्या विधानाबाबतही त्याने ट्वीट करत त्यांना ट्रोल केलं होतं. “मी केआरके नाही. तुम्ही ज्याला पाहत आहात तो केआरके नाही”, अशा आशयाचं ट्वीट त्याने केलं होतं. परंतु, नंतर काही वेळाने हे ट्वीट त्याने डिलीट केलं.

हेही वाचा>> …म्हणून राज ठाकरेंच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच केलं बूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

“आपण ज्या व्यक्तीला पाहत आहात, तो राहुल गांधी नाही आहे. तुम्ही त्याला पाहू शकता, पण समजू शकत नाही. हिंदू धर्मग्रंथांना वाचा, शिवजी बद्दल वाचा तेव्हा तुम्हाला समजू शकेल. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपाच्या डोक्यात आहे. पण, मी राहुल गांधीला मारुन टाकलं आहे. मला माझ्या प्रतिमेशी घेणं-देणं नाही आहे. प्रतिमेबद्दल मला कोणताही रस नाही. तुम्ही मला चांगलं किंवा वाईट बोलू शकता.”