बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय माधुरी अनेक इव्हेंट्सना हजेरी लावली असते. बऱ्याचदा तिच्याबरोबर तिचे पती डॉ. श्रीराम नेनेदेखील असतात. माधुरी व श्रीराम नेने दोघेही मराठी आहेत.

अनेक वर्षे अभिनयात सक्रिय असलेली माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. ‘पंचक’ असं या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी केलं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

तुम्ही माधुरीला अनेकदा मराठीत बोलताना ऐकलं असेल पण कधी डॉ. नेनेंना मराठी बोलताना ऐकलंय का? माधरी व डॉ. नेने यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते मराठीत बोलताना दिसतात. यावेळी त्यांनी त्यांच्या ‘पंचक’ चित्रपटाबद्दल मराठीत माहिती दिली. “माझं मराठी यांच्यासारखं नाही, पण हा चित्रपट विनोद वेगळ्याच लेव्हलला नेतो आणि सगळी नाती व्यवस्थित दर्शवतो,” असं ते व्हिडीओत बोलताना दिसतात.

कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनेक चाहत्यांनी डॉ. श्रीराम नेने यांच्या मराठीचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी त्यांना त्यांच्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, संपदा जोगळेकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी हे कलाकार असल्याची माहिती माधुरीने चित्रपटाची घोषणा केल्यावर समोर आली होती.