दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा या अभिनेत्रीचा ‘अन्नपूर्णी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. मात्र सध्या हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण या सिनेमामुळे निर्माण झालेला वाद. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एक महिन्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रभू रामचंद्रांबाबत सिनेमात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रमेश सोळंकीची पोस्ट काय?

रमेश सोळंकी नावाच्या सोशल मीडिया युझरने एक्स या समाजमाध्यमावर काही पोस्ट केल्या आहेत आणि यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे ते मुद्दे मांडले आहे. नयनताराचा अन्नपूर्णी हा सिनेमा हिंदूविरोधी असल्यचा आरोप करण्यात आला आहे. राम मांसाहारी असल्याचा उल्लेख सिनेमात आला असल्याचंही त्याने म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्याने तक्रार दाखल केली आहे आणि त्याची कॉपीही त्याने पोस्ट केली आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
shrikant shinde latest marathi news
“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम; शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

मी नेटफ्लिक्सच्या विरोधात माझी तक्रार दाखल केली आहे कारण अन्नपूर्णी या सिनेमात प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त विधान केलं गेलं आहे. एककीडे भारतात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जवळ आला आहे. अशात नेटफ्लिक्सने हिंदू विरोधी सिनेमा प्रदर्शित केला आहे असंही या सोळंकीने म्हटलं आहे.

काय आहेत रमेश सोळंकीचे आक्षेप?

१) सिनेमात हिंदू पुजाऱ्याच्या मुलीला बिर्याणी बनवताना आणि नमाज पठण करताना दाखवलं आहे.

२) सिनेमात लव्ह जिहादचं समर्थन आहे

३) सिनेमात अभिनेता फरहान हा अभिनेत्रीला मांस खाण्यासाठी प्रवृत्त करतो. तेव्हा त्याच्या तोंडी संवाद आहे की प्रभू रामही मांस खायचे.

हे तीन प्रमुख आक्षेप रमेश सोळंकीने घेतले आहेत. या सिनेमात जाणीवपूर्वक या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असं त्याने म्हटलं आहे. तसंच या सिनेमामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. रमेश सोळंकनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना ही विनंती केली आहे की या सिनेमाविरोधात तातडीने कारवाई केली जावी.

या सिनेमातला तो संवाद काय?

वाल्मिकी रामायणातील श्लोकाचा उल्लेख करत अभिनेता अभिनेत्रीला सांगतो की जेव्हा जंगलात असताना म्हणजेच प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात गेले होते तेव्हा त्यांनी शिकार करुन मांस शिजवून खाल्लं होतं. रामायणातही लिहिलं आहे रामाने मांस खाल्लं होतं. शंकरानेही मटण खाल्लं होतं असाही उल्लेख पुराणात आहे. असं हा अभिनेता अभिनेत्री नयनताराला सांगतो. हाच प्रसंग पोस्ट करत रमेश सोलंकीने या प्रकरणी पोलिसांकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

या सिनेमाच्या निर्मात्यांकडून याबाबत कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. अन्नपूर्णी हा तमिळ सिनेमा आहे. या सिनेमात नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासह जय, सत्यराज, कार्तिक कुमार आणि रेणुका हे कलाकराही आहेत. हा सिनेमा एका महिला शेफच्या आयुष्यावर आधारित आहे.