scorecardresearch

नेहा मलिकने टॉवेलवर केलं फोटोशूट, अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज व्हायरल

अनेक अभिनेत्रींना मागे टाकत कोणतेही कपडे परिधान न करता तिने टॉवेलवर फोटोशूट केलं आहे.

नेहा मलिकने टॉवेलवर केलं फोटोशूट, अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज व्हायरल

अभिनेत्री नेहा मलिक ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे अधिक ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ते तिचे विविध फोटो शेअर करत असते. अनेकदा तिच्या फोटोंपेक्षा तिने ते फोटो काढताना घातलेल्या कपड्यांची अधिक चर्चा होत असते. पण आता मात्र तिने याबाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकत कोणतेही कपडे परिधान न करता टॉवेलवर फोटोशूट केलं आहे.

नेहा मलिकने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंनी सर्वच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटच्या वेळी तिने कोणतेही कपडे परिधान केलेले नसून तिने फक्त टॉवेलवर फोटोशूट केलं आहे. हे फोटो काढताना तिने स्वतःभोवती पांढरा टॉवेल गुंडाळला आहे. एका बेडरूममध्ये तिने तिचे फोटो काढले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये दरवाजाजवळ उभं राहून ती वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय.

हेही वाचा : Flashback 2022: सनी लिओनी ते अमिताभ बच्चन…’या’ बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केलेली आलिशान घरं ठरली चर्चेचा विषय

आणखी वाचा : गर्लफ्रेंड सबा आझाद आणि दोन्ही मुलांना घेऊन हृतिक रोशन परदेशात रवाना, नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का

तिचं हे बोल फोटोशूट पाहून नेटकरीही आवाक् झाले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा बोर्ड अंदाज काहींना पसंत पडला तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. या बोर्ड फोटोंमुळे नेहा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 08:04 IST

संबंधित बातम्या