अक्षय कुमारच्या मागे लागलेला शुक्लकाष्ठ काही संपायचं नाव घेत नाहीये. ‘ओह माय गॉड २’ सोडला तर अक्षयचे बाकी चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले आहेत. एका वर्षांत डझनभर चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारबद्दल एकूणच तक्रारीचा सूर प्रेक्षकांमधून ऐकू येऊ लागला आहे. एकेकाळी अक्षयच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघायचे पण आता हाच खिलाडी कुमार बायोपिक आणि रिमेकच्या जाळ्यात अडकल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

अशातच आता अक्षयने त्याच्या आगामी ‘सरफिरा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे ज्यामुळे प्रेक्षक अक्षयवर अधिकच वैतागले असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षयचा हा चित्रपट तमिळ स्टार सुरियाच्या ‘सोरारई पोटरु’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. ‘सोरारई पोटरू’ या मूळ चित्रपटाच्या मूळ दिग्दर्शिका सुधा कोंगाराच अक्षयच्या या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२२ मध्ये या मूळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले ज्यात सुरियालाही उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार अजय देवगणबरोबर विभागून देण्यात आला होता. तेव्हाच या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा करण्यात आली होती.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
Sharad Ponkshe son sneh ponkshe movie
शरद पोंक्षेंचा मुलगा सिनेसृष्टीत करतोय पदार्पण, पहिल्याच चित्रपटात वडिलांसह काम करण्याबाबत स्नेह पोंक्षे म्हणाला…

आणखी वाचा : “बस्तरमध्ये तिरंगा फडकावणं हा गुन्हा…”, अदा शर्माच्या ‘बस्तर’चा दूसरा हृदयद्रावक टीझर प्रदर्शित

आता या रिमेकची एक छोटीशी झलक समोर आली आहे अन् सोशल मीडियावर सगळ्यांनीच अक्षयवर टीका करायला सुरुवात केली आहे. अक्षय एकाच वर्षी भरपुर चित्रपट करतो त्यामुळेच त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मध्यंतरी अक्षयने याबाबतीत स्वतःच एक नियम घातला होता की त्याच्या दोन चित्रपटांमध्ये किमान सहा महिन्यांचा फरक असेल. आता मात्र अक्षयने स्वतःचा तो नियम मोडीत काढला आहे. अक्षयच्या पोतडीत भरपुर चित्रपट असल्याने त्याला सहा महिन्यांचा फरक ठेवणं कठीण होत असल्याचं काही तज्ञांचं मत आहे. २०२४ च्या एप्रिलमध्ये अक्षय व टायगर यांचा ‘बड़े मियां छोटे मियां’ प्रदर्शित होणार आहे तर लगेच त्याचा हा ‘सरफिरा’ जुलै २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यामुळे प्रेक्षक अक्षयवर बरेच नाराज आहे. ‘सरफिरा’चा टीझर प्रदर्शित होताच लोक त्यावर तुटून पडले आहेत अन् त्यांनी अक्षयला खडेबोल सुनवायला सुरुवात केली आहे. ट्विटरवर तर सतत त्याला ट्रोल केलं जात आहे. अक्षयचा हा चित्रपट सपशेल आपटणार असल्याचं काहींनी लिहिलं आहे तर काहींनी हा चित्रपट ५० कोटीदेखील कमावणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे. हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट असे असं भाकीतही काही लोकांनी मांडलं आहे. तसेच सूर्याचा हा चित्रपट आधीच प्रदर्शित झाल्याने अन् तो हिंदीतही उपलब्ध असल्याने अक्षयचा हा चित्रपट नक्की फ्लॉप ठरणार असंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

“अक्षयने काहीतरी नवीन केलं पाहिजे, रिमेक आणि बायोपिक करून काही होणार नाही.” असं सल्ला एका युझरने दिला आहे. एकूणच अक्षयच्या या आगामी चित्रपटाच्या बाबतीत सगळेच नाराज असून त्याने काहीतरी नवीन प्रयोग करावे अशी अपेक्षा प्रेक्षकांची आहे. ‘सरफिरा’ हा १२ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयसह राधिका मदान व परेश रावल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर सुरियादेखील यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.