कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे ९५ वे वर्ष आहे. या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार भारतीयांसाठी खास असणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या सोहळ्यात पुरस्कार जाहीर करताना (presenter) म्हणून दिसणार आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी फारच खास ठरणार आहे. या वर्षी ‘चेल्लो शो’, ‘आरआरआर’चे ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. तर दुसरीकडे आता दीपिका पदुकोणही ऑस्कर पुरस्काराशी जोडली जाणार आहे. येत्या १३ मार्चला होणाऱ्या या सोहळ्यात दीपिका ही ऑस्कर पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे.
आणखी वाचा : Oscar 2023: ऑस्करमध्ये घडणार नाही विल स्मिथ प्रकरणासारखी घटना, अकादमीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दीपिकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. तिने स्वत: ऑस्कर पुरस्कार जाहीर करणाऱ्यांची नावं शेअर केली आहेत. रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोझ, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, दीपिका पदुकोण, क्वेस्टलव, झो सलदाना आणि डोनी येन हे कलाकार ऑस्कर पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे.

आणखी वाचा : दोन घटस्फोट झालेल्या स्नेहा वाघचे प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल वक्तव्य, म्हणाली “त्या माणसाशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने शेअर केलेल्या या गुडन्यूजनंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहने यावर कमेंट केली आहे. रणवीरने हाताने टाळ्या वाजवतानाचे इमोजी शेअर करत दीपिकाचे कौतुक केले आहे. दरम्यान येत्या १२ मार्चला रात्री ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार १३ मार्चला सकाळी ५.३० वाजता हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.