अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही कायमच चर्चेत असते. नुकतंच तिचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. नुकतंच पलकने दिलेल्या एका मुलाखतीत आई श्वेता तिवारीच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे.

पलकने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आईच्या संघर्षाबद्दल खुलासा केला आहे. “माझी आई ही रुढीवादी कुटुंबातून आली आहे. तिच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयावर कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या आईने खूप वाईट काळ पाहिला आहे. तिचा यशाचा आलेख हा कायमच उत्कृष्ट राहिला आहे. तिने तिच्या जीवनातील बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा केली आहे”, असे पलक तिवारीने म्हटले.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

“माझी आई श्वेता ही एका चाळीत राहत होती. तिचे घर फार लहान होते. त्यात आजोबा, माझी आजी, माझे मामा आणि माझी आई राहत होते. माझी आई राहत असलेली खोली फक्त एक बेडरुमची होती. माझ्या आईची सुरुवात तिथूनच झाली. त्यामुळेच कोणतीही गोष्टी या सहजासहजी येत नाही. त्यामुळे या हलक्यात घेऊ नका”, असेही पलकने म्हटले.

“तिला त्याकाळी भावी पिढीसाठी काहीतरी करायला हवं, हे कळले होते आणि तिने त्यानुसार पावलं उचलली. माझी आजी जरी माझ्या आईला यात साथ देऊ शकत नसली तरी तिने जमेल तशी मदत तिला केली”, असेही तिने सांगितले.

आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्वेता तिवारीने १९९८ मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००० मध्ये पलकचा जन्म झाला, पलकला श्वेताने एकटीने वाढवलं, त्यानंतर तिने २०१२ मध्ये पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला व २०१३ मध्ये अभिनव कोहलीशी लग्न केलं. पण तिचं दुसरं लग्नही फक्त ९ वर्षे टिकलं. श्वेताने २०२२ मध्ये अभिनवपासून घटस्फोट घेतला व आता ती एकटीच पलक व मुलगा रेयांशचा सांभाळ करत आहे.