सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बरेच नवीन चेहेरे बघायला मिळणार आहेत. या नवीन चेहेऱ्यांपैकी एक चेहेरा म्हणजे पलक तिवारी. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरबरोबर संवाद साधताना पलकने या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. याबरोबरच सलमानबरोबर काम करायची पलकची ही पहिली वेळ नाही. याआधी आलेल्या ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या चित्रपटामध्ये पलकने सहाय्यक म्हणून काम केलं आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने महिला सहकाऱ्यांसाठी केलेल्या नियमाबद्दल पलकने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “नसीरुद्दीनचे हात पाय मोडावेत…” असं म्हणत नाना पाटेकरांनी घातलेलं देवाला साकडं

शिवाय सलमान खानच्या सेटवरील या नियमामुळे पलकची आई आणि अभिनेत्री श्वेता तिवारीचा जीवही भांड्यात पडल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं. सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं. याविषयी बोलताना पलक म्हणाली, “सलमान सर खूप पारंपरिक आहेत. मुलींनी जे योग्य वाटेल ते कपडे परिधान करावे पण त्यांच्या सुरक्षित असावं हा त्यांचा हेतू असतो. सेटवर बरेच अनोळखी पुरुष वावरत असतात त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही. त्यामुळे सेटवरील मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केला आहे.”

हार्डी संधुबरोबरच्या ‘बिजली बिजली’ या गाण्यातून पलकला प्रसिद्धी मिळाली. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडे, शेहनाज गिल, पलक तिवारी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच जगपती बाबू हे या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak tiwari says there is special rule for female crew members on salman khan film set avn
First published on: 12-04-2023 at 17:23 IST