बॉलीवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांची प्रकृती बिघडली आहे. रोहित यांची प्रकृती गंभीर असून ते एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. ते सध्या जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित बल यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, फॅशन डिझायनर रोहित बल यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना आधीपासून हृदयविकाराची समस्या आहे. २०१० मध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर इमरजेन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रोहित यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांचा मित्र व अभिनेता अर्जुन रामपाल त्यांना भेटायला गेला होता. त्यांना पॅनक्रिएटायटिस देखील आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आणि भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक असलेले रोहित बल हे मूळचे काश्मीरचे आहेत. तीन दशकांहून अधिक काळापासून ते फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांना २००१ आणि २००४ मध्ये इंटरनॅशन फॅशन अवॉर्ड आणि २००६ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ म्हणूनही गौरविण्यात आलं होतं. फेब्रुवारी २०१२ मध्ये, त्यांना लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्रँड फिनाले डिझायनर निवडण्यात आलं होतं.

Story img Loader