बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी सिटाडेल वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी भारतात आहे. प्रियांका पती निक जोनस व लेक मालती मेरीसह मुंबईत आहे. अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन समारंभालाही तिने हजेरी लावली होती. याचदरम्यान प्रियांकाने पती निक जोनससह फोटोशूट केलं आहे.

प्रियांका-निकने रिक्षाबरोबर हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाकांने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत हटके लूक केला आहे. तर निकने ब्लेझरमध्ये खास लूक केला आहे. रिक्षाच्या बाहेर उभं राहून प्रियांका आणि निकने फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. परंतु, प्रियांका-निकपेक्षा फोटोमधील रिक्षाचालकाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या चर्चांवर रॅपर बादशाहची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी…”

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

प्रियांका-निकच्या या फोटोमध्ये रिक्षाचालकही दिसत आहे. फोटोसाठी पोझ देणाऱ्या प्रियांका-निककडे तो बघत आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “रिक्षावाले काका : तुमचं झालं असे तर मी निघू?” असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

priyanka chopra

“रिक्षावाले काका : आधी पैसे द्या” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “उबर वर रिक्षासाठी १७० रुपये मोजावे लागत होते. आम्ही रस्त्यावरील रिक्षा पकडून १२० रुपयांत आलो”, असं म्हटलं आहे.

priyanka chopra

“कोण आहेत हे लोक? कुठून येतात हे लोक?” असंही एकाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
priyanka chopra

अभिनेत्री प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनससह लग्नगाठ बांधली. २०२२मध्ये सरोगसीच्या मदतीने प्रियांका व निक आईबाबा झाले.