बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा मागच्या बऱ्याच काळापासून पॉर्नोग्राफी केसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या केसमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राने त्याच्यावर फार गंभीर आरोप केले होते. पण आता शर्लिन चोप्रावर कमेंट केल्याने राज कुंद्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक वॉर सुरु आहे. राखी सावंतने मीडियाशी बोलताना शर्लिनबाबत बरंच काही बोलल्यानंतर शर्लिनने तिला टक्कल लपवणारी आणि भाड्याचे बॉयफ्रेंड फिरवणारी असं म्हटलं होतं. सोशल मीडियावर या दोघींच्या व्हिडीओ आणि वक्तव्यांची खिल्ली उडवली जात आहे. अशात आता राज कुंद्राने शर्लिन चोप्रावर कमेंट करणारं ट्वीट केलं आहे.

आणखी वाचा-पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? असं विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राचं उत्तर, म्हणाला…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनंतर राज कुंद्राचं ट्वीट समोर आलं आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं, “शर्लिन चोप्राबद्दल ट्वीट या योग्यतेची ती नाहीच, पण ती कायदेशीर नोटीस पाठवून तिचा चुकीचा मुद्दा बरोबर आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने स्वत:चे अश्लील व्हिडीओ स्वतःच अपलोड केले आहेत आणि आता ती ते पायरेटेड आणि व्हायरल असल्याचं सांगत आहे. कोणीही सहजपणे हे गुगल करू शकतं.” अर्थात नंतर हे ट्वीट राज कुंद्राने डिलीट केलं. पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉर्ट सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

raj kundra tweet

दरम्यान २०२१ मध्ये, क्राईम ब्रँचने मुंबईत राज कुंद्राविरुद्ध अश्लील चित्रपट बनवून अॅपद्वारे प्रदर्शित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एवढंच नाही तर या प्रकरणात राज कुंद्राला दोन वर्षांसाठी तुरुंगवासही सुनावण्यात आला होता. मात्र, जामिन मिळाल्यानंतर तो आता बाहेर आला आहे. मात्र तुरुंगातून सुटल्यापासून राज कुंद्रा सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा मास्कने झाकून फिरताना दिसतो.