scorecardresearch

“मी माझ्या पतीला…” लव्ह-जिहाद संदर्भातील ‘त्या’ प्रश्नावर राखी सावंतचं स्पष्ट उत्तर

आदिल खान दुर्रानीने आपण इस्लामनुसार राखी सावंतशी लग्न केल्याची कबुली दिली आहे.

“मी माझ्या पतीला…” लव्ह-जिहाद संदर्भातील ‘त्या’ प्रश्नावर राखी सावंतचं स्पष्ट उत्तर
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. राखीने सात महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यावर तिने आदिलबरोबरच्या लग्नाचा खुलासा केला. तसेच लग्नाचे फोटोही शेअर केले होते. सुरुवातीला फक्त राखीने लग्नाची कबुली दिली, पण आदिलने याबाबत बोलणं टाळल्याने राखीने आपल्याला लव्ह-जिहादची भीती वाटत असल्याचंही म्हटलं होतं.

सेल्फी घेताना चाहत्याने स्पर्श केला अन् राखी सावंत भडकली; म्हणाली “माझं लग्न…”

अखेर आदिल खान दुर्रानीने आपण इस्लामनुसार राखी सावंतशी लग्न केल्याची कबुली दिली. लग्नाचे ते सर्व फोटो खरे आहेत, मी तिचं नाव फातिमा ठेवलंय आणि आम्ही लग्न केलंय, असं आदिलने सांगितलं. यानंतर राखी व आदिलला लव्ह-जिहादबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली, “मला माहीतच नाही की लव्ह-जिहाद म्हणजे काय? मला फक्त लव्ह माहीत आहे. आम्ही जात-पात मानत नाही. आदिलने मला कबुल केलंय, मी त्याला कबुल केलंय. आमच्या दरम्यान धर्म नाही. होय, आम्ही निकाह केला आहे आणि आदिलने माझं नाव फातिमा ठेवलंय. ते नाव आणि इस्लाम दोन्हीही मी कबुल केलंय. मी माझ्या पतीला मिळवण्यासाठी, माझं प्रेम मिळवण्यासाठी जे करू शकत होते, ते सर्व मी केलंय.”

दरम्यान, राखीप्रमाणेच आदिलही लव्ह-जिहाद म्हणजे काय हे माहीत नाही, असं म्हणताना दिसतो. राखी व आदिल यांचं लग्न मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. आदिल आपल्याला स्वीकारण्यास नकार देत असल्याचा दावाही राखीने केला होता. पण, आदिलने मात्र आता राखीला स्वीकारलंय आणि ते दोघेही एकत्र राहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 08:14 IST

संबंधित बातम्या