scorecardresearch

Video : राखी सावंतने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

मलायका अरोराला कॉपी करत आहे राखी सावंत, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

rakhi sawant rakhi sawant copy malaika arora walk
मलायका अरोराला कॉपी करत आहे राखी सावंत, 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सौंदर्य, फिटनेस, लूकच्याबाबतीत तरुण अभिनेत्रींनाही मलायका अरोरा तगडी टक्कर देते. मलायका चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा ट्रोल करण्यात येतं. मलायका ज्या पद्धतीने चालते त्यावरुनही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

आणखी वाचा – लग्न, सात वर्षांचा संसार, घटस्फोट अन्…; वर्षभरापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्या गुपचूप उरकलं दुसरं लग्न, मुलगी झाल्यानंतर म्हणाला, “मला आता…”

मलायका ज्या पद्धतीने चालते त्यावरुनच सोशल मीडियावर अनेक रिल व्हिडीओही व्हायरल झाले. अनेकांनी मलायकाच्या चालण्याची कॉपीही केली. आता यामध्येच भर म्हणजे राखी सावंतने मलायकाला फॉलो करत तिची कॉपी केली आहे. राखी जीममधून बाहेर पडताच पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. यावेळी राखीने मलायकाची केलेली कॉपी पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

मलायका जीममधून बाहेर येताच ज्या पद्धतीने चालते त्याचपद्धतीने राखीही व्हायरल व्हिडीओमध्ये चालताना दिसत आहे. विरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिला मलायका किती आवडते हे सांगताना दिसत आहे. तसेच तिने मलायकाला अगदी परफेक्ट कॉपी केलं आहे.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

“मलायकाला तर सगळ्यांनाच आवडते. मलाही मलायका खूप आवडते. आता यापुढे मी असंही चालते”. असं राखी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. राखी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. पती आदिल खान दुर्रानी व तिच्यामधील वाद चर्चेत होता. आता या सगळ्यामधून राखी बाहेर पडली आहे. तिने आता नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या