Rakhi Sawant : राखी सावंत तिच्या उलटसुलट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पती, पत्नी आणि पंगाच्या शुटिंगसाठी मुंबईत आली होती. तिने डोनाल्ड ट्रम्प हे तिचे वडील असल्याचा दावा केला आहे. हे ऐकून उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प त्रास देत आहेत असं राखीला सांगितलं. त्यावर राखी म्हणाली धन्यवाद, माझ्याशी पंगा घेऊ नका असं म्हणाली.
राखी सावंत म्हणाली डोनाल्ड ट्रम्प माझे वडील
राखी सावंत म्हणाली, माझी आई हयात नाही. तिने माझ्यासाठी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने लिहिलं आहे की तुझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत. राखी सावंत काहिशी भावूक झाली आणि म्हणाली मी भारत देश सोडला आहे कारण कॅन्सरमुळे माझे आई आणि वडील वारले. आता मला मीडियाच्या नजरेत यायचं नाही. एक नवी सुरुवात करायची आहे.
राखी सावंत दुबईला का गेली?
राखी सावंतने हे मान्य केलं की मला मीडियापासून दूर राहायचं होतं म्हणून मी दुबईत निघून गेले. राखीने तिथे एक आलीशान अपार्टमेंट घेतलं आहे. अल करामामध्ये राखी सावंतने अॅक्टिंग अकॅडमी सुरु केली आहे अशी माहिती मिळाली आहे. राखीने हेदेखील सांगितलं की तिचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. राखी सावंतने आदिल खानसह तलाक घेतला आहे. राखीने आदिल खानवर शारिरीक छळ, मानसिक छळ, मारहाण आणि पैसे वसुलीचे आरोप केले आहेत. आदिलनेही राखी सावंतवर लबाडीचा आणि एकनिष्ठ न राहिल्याचा आरोप केला आहे. राखीने आमचे खासगी व्हिडीओ लिक केले आहेत असाही दावा आदिलने केला आहे.
पॉर्नस्टार म्हणून उल्लेख झाल्यावर काय म्हणाली होती राखी सावंत?
२०२३ मध्ये राखी सावंतला पॉर्न स्टार म्हटलं गेलं त्यावेळी ती चिडली आणि म्हणाली होती, ‘फिल्मग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी पॉर्नस्टार कधी झाले? पॉर्नस्टारचा अर्थ काय, शारीरिक संबंध ठेवणं, अवैध संबंध ठेवणं, अंगप्रदर्शन करणं. मी आतापर्यंत असं कधीही काहीही केलेलं नाही. जर आदिलबरोबर मी शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्याबरोबरच मी लग्न केलं. त्यावेळी मी त्याची जात, धर्म काहीही पाहिलं नाही. आमच्याकडून चूक झाली आम्ही लग्न केलं. ज्या खऱ्या पॉर्नस्टार असतात त्यांची तर तुम्ही दिव्यांनी आरती ओवाळता आणि जी साधी मुलगी आहे तिला पॉर्नस्टार बनवून टाकता. छान. धन्यवाद. मी सगळं मान्य करेन, पण मी पॉर्नस्टार आहे हे म्हणणं मी कधीही मान्य करणार नाही.