अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. आत्तापासूनच अयोध्येत पयर्टकांची गर्दी सुरु आहे. राजकारणींपासून अनेक बॉलीवूड कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी रणबीर व आलियाची भेट घेत त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. सोशल मीडियावर याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकण राज्य प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माते महावीर जैन यांच्याकडून रणबीर व आलियाला या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. रणबीर व आलियाने हे निमंत्रण स्विकारले असून ते या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi on Ram Mandir Pranpratistha Ceremony
“मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. रणबीर व आलियाबरोबर अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय भट्ट, सनी देवल , प्रभास, यश यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा- “आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा आणू नका”, मालदीव Vs लक्षद्वीप वादावर स्पष्टच बोलले अमिताभ बच्चन; म्हणाले, “हे खूप…”

राम मंदिराचे वैशिष्टय

पारंपरिक नागर शैलीत राम मंदिर बनवण्यात येत आहे. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल. मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत. मंदिराच्या खांब आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना आयातकार तटबंदी असणार आहे. चारही दिशांना याची एकूण लांबी ७३२ मीटर आणि रुंदी १४ फूट असणार आहे.