रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या फ्रेश जोडीचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अखेर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. आता त्यांच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. ट्रेलर पाहूनच त्यांच्यातली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. तर या चित्रपटाने रिलीजपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगधूनही चांगली कमाई केली आहे. तर त्या पाठोपाठ पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांना खुश करण्यात यशस्वी झाला आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

आणखी वाचा : …म्हणून ओशो यांनी दिलेली माळ महेश भट्ट यांनी फेकलेली कमोडमध्ये; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इतकंच नव्हे तर तर या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ला थेट टक्कर दिली आहे. ‘पठाण’ला आयएमडीबीवर १० पैकी ६.४ असं रेटिंग तर रणबीर श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी १० पैकी ६.७ असं रेटिंग मिळालं आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.