बॉलिवूडचा पुढील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत व त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या ट्रेलरची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीरच्या करिअरमधील हा सर्वात हिंस्त्र चित्रपट ओळखला जात आहे. आता सोशल मीडियावर या चित्रपटाच्या लांबी आणि ट्रेलरबद्दल एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे.

या चित्रपटाची लांबी ३ तासांपेक्षा जास्त असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. तर ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ही तारीख २३ नोव्हेंबरसुद्धा सांगितली जात आहे. सणासुदीचे दिवस असल्याने या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रीपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.

santosh pathare, aamhi documentarywale, dr santosh pathare documentary making journey, documentary making process, documentary making, documentary, Sumitra Bhave Ek Samantar Prawaas, Search of Rituparno,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
Bride runs away from the wedding with someone else
VIDEO: मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर तयार; अन् नवरी बॉयफ्रेंडच्या गाडीत बसून फरार
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘डंकी’चा टीझर पाहून चाहत्यांना आठवला त्याचा सुपरफ्लॉप ‘झीरो’; चित्रपट रचणार वेगळाच इतिहास

तसेच या चित्रपटाची लांबी ३ तास १८ मिनिटं असल्याची चर्चा आहे. सध्या दोन तासांच्या वर चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहणं हे लोकांच्या सवयीचं राहिलेलं नसल्याने निर्मात्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट ३ तास १८ मिनिटांचा असल्याने त्यासाठी दोन मध्यांतर (interval) ठेवण्यात येणार अशीही चर्चा होती. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं ‘कोईमोई’ आणि ‘आयएमडीबी’ या दोन्ही वेबसाईट्सनी सांगितलं आहे.

‘आयएमडीबी’नुसार ‘अ‍ॅनिमल’ची लांबी २ तास २६ मिनिटं असल्याचं सांगितलं आहे. अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. ‘अ‍ॅनिमल’ची कथा व दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ व ‘कबीर सिंग’सारखे चित्रपट देणारे संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. हा आजवरच्या चित्रपट इतिहासातील अत्यंत हिंस्र चित्रपट असल्याचं संदीप यांनीही एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. या चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, सुरेश ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.