Premium

“मी गीतांजलीच्या कृतींवर प्रश्न विचारल्यावर दिग्दर्शकाने मला…”, ‘अ‍ॅनिमल’मधील भूमिकेबाबत रश्मिका मंदानाचा खुलासा

‘अ‍ॅनिमल’मधील गीतांजलीच्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने केलेली पोस्ट चर्चेत

Rashmika Mandanna on her Animal role
रश्मिका मंदाना नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या (फोटो- इन्स्टाग्राम)

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या व्यावसायिक चित्रपटाने अपेक्षेप्रमाणेच बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. पण या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यात रणबीर कपूरने रणविजय हे पात्र साकारलं आहे, तर रश्मिका मंदानाने त्याच्या पत्नीची गीतांजली नावाची भूमिका केली आहे. यात रणविजय विवाहित असून, दोन मुलं असूनही गीतांजलीची फसवणूक करतो असं दाखवण्यात आलं आहे. या सीनवरूनही बरीच टीका होत आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अ‍ॅनिमल’मधील रश्मिकाच्या गीतांजली या पात्राला चित्रपट पाहिलेल्या लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आपणच या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले होते, असा खुलासा रश्मिकाने केला. “गीतांजली. मी तिचे एका वाक्यात वर्णन केले तर… तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवणारी ही घरातील एकमेव शक्ती असेल. ती शुद्ध, खरी, कोणतेही फिल्टर नसलेली, मजबूत आहे. कधी कधी एक अभिनेत्री म्हणून मी गीतांजलीच्या काही कृतींवर प्रश्न विचारले होते,” असं रश्मिकाने म्हटलं आहे.

“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

“मला आठवतं की माझ्या प्रश्नांवर दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की ही रणविजय आणि गीतांजली यांची कथा आहे. या कथेत त्यांचे प्रेम आणि उत्कटता, त्यांचे कुटुंब आणि त्यांचं जीवन आहे. सर्व हिंसाचार, दुःख आणि असह्य वेदनांनी भरलेल्या जगात गीतांजली शांतता आणि विश्वास आणते. तिचा पती आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ती तिच्या देवाला प्रार्थना करते. ती सर्व समस्यारुपी वादळांना तोंड देते. आपल्या कुटुंबासाठी ती काहीही करायला तयार असते. गीतांजली माझ्या नजरेत अतिशय सुंदर आहे आणि काही अर्थाने ती अशा महिलांसारखी आहे ज्या आपल्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत. थिएटरमध्ये यशस्वी आठवडा पूर्ण केल्याबद्दल ‘अॅनिमल’ टीमला शुभेच्छा,” असं रश्मिकाने लिहिलं.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा मागच्या आठ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने भारतात आतापर्यंत ३६१ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत ‘अॅनिमल’ने ५६३ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची हीच गती कायम राहिली तर तो लवकरच जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडू शकतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashmika mandanna reveals that she asked questions about her geetanjali character from animal movie hrc

First published on: 09-12-2023 at 10:53 IST
Next Story
अमिताभ बच्चन यांनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण