रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणजेच वडिलांच्या परवानगीने राजकारणापेक्षा वेगळं क्षेत्र निवडत रितेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. “माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू काळजी घे” वडिलांनी दिलेल्या या एका सल्ल्यामुळे रितेश देशमुखचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं.

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त रितेशने आपल्या कुटुंबांसह वडिलांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. याचे काही फोटो अभिनेत्यासह त्याची पत्नी जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख यांचं बॉण्डिंग पहिल्यापासूनच खूप खास होतं. त्यांनी सुनेवर मुलीसारखी माया केली.

हेही वाचा : “नाटक, अभिनय तुझ्यासाठी नाही…”, पुरस्कार जिंकल्यावर अक्षया नाईकची भावुक पोस्ट; म्हणाली, “गेले ४८ तास…”

रितेशने या फोटोंना “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा…” असं कॅप्शन दिलं आहे. यातील पहिल्या फोटोत अभिनेता त्याची दोन्ही मुलं राहील आणि रियान, पत्नी जिनिलीया विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र पाहायला मिळतंय. यामध्ये रितेशची दोन मुलं विलासराव देशमुख यांच्या समाधीला नमस्कार करताना दिसत आहेत. रितेशची ही पोस्ट पाहून त्याचं त्याच्या वडिलांवर असणारं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. याशिवाय काही नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत विलासराव देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा : Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता रितेश देशमुखची पोस्ट

हेही वाचा : Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, जिनिलीया आणि रितेश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेशप्रमाणे त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखनेही सासऱ्यांच्या आठवणीत भावुक होत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा : Video: कुशल बद्रिकेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय विनोदवीराची ‘मॅडनेस मचाएंगे’ हिंदी कार्यक्रमात एन्ट्री, व्हिडीओ आला समोर

याशिवाय या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.