बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरनंतर सलमानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आणखीनच उत्सुक आहेत. मात्र, ट्रेलर रिलीज होण्याअगोदरच या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला (ॲडव्हान्स बुकिंग) मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा- सलमानच्या ‘तेरे नाम’मधील पात्राला भूमिका चावला घाबरली होती? खुद्द अभिनेत्याने शेअर केला किस्सा, म्हणाला, ‘मी तिला मारण्यासाठी…’

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

जवळजवळ चार वर्षानंतर सलमान मोठ्या पडद्यावर येणार आहे. त्यामुळे भाईजानच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे बोलले जात आहे. लंडनमध्ये चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय देशांमध्ये तिकीट विक्री सुरू झाली आहे.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, मध्य पूर्वमध्येही लवकरच आगाऊ बुकिंग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, किसी का भाई किसी की जानची आगाऊ बुकिंग भारतात कधी सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, भारतात या चित्रपटाची अगाऊ बुकिंग १७ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-

दरम्यान, सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत.साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत.