बॉलीवूडमध्ये एखादं लग्न असेल तर अनेक सेलिब्रिटी त्या लग्नाला जातात. इतकंच नाही तर लग्नात मदत करतात. पाहुण्यांना जेवण वाढण्याचंही काम करतात. अगदी अंबानी कुटुंबातील लग्नातही अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना जेवण वाढताना पाहिलं गेलं आहे. अशाच रितीने रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर हिच्या लग्नातही काही सेलिब्रिटींनी मदत केली होती. तिच्या लग्नात सलमान खान बारटेंडर होता. सलमान दारू देत असल्याने दारू संपायची वेळ आली होती, असा किस्सा नीतू कपूर यांनी कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये सांगितला आहे.

कपिल शर्माने त्याच्या नवीन शोच्या प्रीमियर एपिसोडमधील काही क्लिप्स शेअर केल्या आहेत, त्यात कपिलने रिद्धिमाला इंडस्ट्रीतील आवडत्या कलाकारांबद्दल विचारलं. तिने सुरुवातीला तिच्या आई-वडिलांची नावं नीतू कपूर आणि ऋषी कपूर घेतली. पण रणबीर कपूरने खुलासा केला की रिद्धिमा सलमान खानची मोठी चाहती होती. तिने रुममध्ये सलमान खानचे पोस्टरही लावले होते.

पुनर्विवाह! पहिल्या लग्नात दोघांनाही अपयश, अभिनेत्रीने ४३ वर्षीय अभिनेत्याशी केलं दुसरं लग्न; शाही सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी

कपिलने विचारलं की रिद्धिमा व भरतच्या लग्नात सलमान खरंच बारटेंडर (दारू सर्व्ह करणारा) होता का? तेव्हा रिद्धिमा ‘होय’ असं म्हणाली. त्यानंतर नीतू कपूर यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. ती म्हणाली, “सलमान म्हणाला की मी बारटेंडर असेन. मी म्हटलं ठीक आहे. मग सलमान खान सर्वांना दारु देत होता. तेवढ्यात वेटर्स आले आणि त्यांनी सांगितलं की दारू संपत आहे. ऋषीजी म्हणाले, ‘मला खूप सारी दारू आणली आहे, इतक्यात कशी संपली?’ मग लक्षात आलं की पाहुणे दारू फेकून देतात आणि सलमानकडे पुन्हा दारू मागत आहेत. सगळ्यांना दारू मागायची होती कारण बारटेंडर सलमान खान होता. मग ऋषीजी तिथं गेले आणि सलमानला म्हणाले, ‘यार तू तिथून निघ’.

बोनी कपूर मुलांचे रिलेशनशिप आणि त्यांच्या जोडीदारांबद्दल म्हणाले, “मी नाराजी…”

ज्वेलरी डिझायनर असलेल्या रिद्धिमा कपूरने २००६ मध्ये बिझनेसमन भरत साहनीशी लग्न केलं. त्याआधी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. लंडनमध्ये शिकत असताना ते प्रेमात पडले होते. २०११ मध्ये या जोडप्याला मुलगी झाली, तिचं नाव समारा साहनी आहे.