बॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी एकत्र स्क्रीन शेअर करत सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. ७० आणि ८० च्या दशकात अभिनेत्री शबाना आझमी आणि स्मिता पाटील या दोघींनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. १९८२ मध्ये आलेल्या ‘अर्थ’ चित्रपटात त्या दोघी दिसल्या होत्या. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्मिता पाटील आणि शबाना आझमी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी बनल्या होत्या.

हेही वाचा अभिनयासाठी शिक्षण सोडलं, सुपरहिट चित्रपटांमध्ये केलं काम; लहानपणीच ज्योतिषाने वर्तवलेलं ‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूचं भाकीत

या चित्रपटानंतर दोघींमध्ये भांडण व वादाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण, शबाना आझमी किंवा स्मिता पाटील या दोघांनीही यावर काहीही वक्तव्य केलं नव्हतं. त्यानंतर १९८६ मध्ये स्मिता पाटील यांचे निधन झाले. आता स्मिता यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३७ वर्षांनी शबाना आझमी यांनी स्मिता पाटील यांच्याशी भांडण झाल्याच्या त्याकाळी आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – गर्भवती पत्नीला भर कार्यक्रमात ओढत नेल्याने ट्रोल, सना खानचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?

शबाना आझमी यांनी नुकताच ‘न्यूज १८’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “त्या बातम्यांमध्ये सत्य होतं. स्मिता आणि मी दोघीही एकमेकींना प्रतिस्पर्धी मानायचो. आम्ही दोघीही एकमेकांशी प्रतिस्पर्ध्यांसारख्याच वागलो. पण प्रसारमाध्यमांनी तो वाढवला, त्यात थोडा मसाला टाकला आणि वाढवून गोष्टी सांगितल्या. मात्र यासाठी मी मीडियाला पूर्णपणे दोष देणार नाही.”

हेही वाचा – चार वर्षांत मोडला प्रेमविवाह, तीन सुप्रसिद्ध अभिनेत्रींशी अफेअर अन्…; आता ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय सिद्धार्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शबाना आझमी पुढे म्हणाल्या, “शत्रुत्व किंवा भांडणाची चर्चा पूर्णपणे खोटी नव्हती. त्याला काही तरी आधार नक्कीच होता. पण नंतर त्या गोष्टी वाढवून सांगितल्या गेल्या. पण मला वाटतं की मी तिच्याबद्दल अनेक कठोर गोष्टी बोलल्या होत्या, ज्या मी बोलायला नको होत्या आणि आजपर्यंत मला त्याची खंत आहे. मी असं करायला नको होतं. पण स्मिता पाटीलचे आई-वडील, तिच्या बहिणी आणि आता तिचा मुलगा प्रतीक यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”

‘अर्थ’ चित्रपटात स्मिता पाटील आणि शबाना आझमी खऱ्या आयुष्याप्रमाणेच एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. पण दोघींमधील वाद सर्वश्रूत होता, शबाना आझमींनी अनेकदा स्मिता यांच्यावर टीका केली होती.