IPL 2024 चा अंतिम सामना आज ( २६ मे ) कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर दोन तगड्या संघांमध्ये ही अंतिम लढत होणार आहे. या सामन्याच्या अखेरीस यंदा आयपीएलच्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सगळ्याच क्रिकेटप्रेमींच्या मनात या सामन्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खान हा केकेआरचा टीमचा संघमालक आहे. यावर्षी किंग खान केकेआर संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी मैदानात आवर्जुन उपस्थित होता. मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या सामन्याला सुद्धा शाहरुख उपस्थित होता. यावेळी केकेआरने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु, या सामन्यानंतर उष्माघातामुळे शाहरुखची प्रकृती बिघडली होती.

बुधवारी ( २२ मे ) त्याला अहमदाबाद येखील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे शाहरुख अंतिम सामन्याला येणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह होतं. परंतु, त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री जुही चावलाने आधीच दिलेल्या माहितीनुसार किंग खान आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईहून चेन्नईला रवाना झाला आहे. याचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्ज हैदराबाद हा अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने चाहते आणि सेलिब्रिटी चेन्नईला पोहोचू लागले आहेत. रविवारी दुपारी मुंबईच्या विमानतळाबाहेर शाहरुख खान, त्याची लेक सुहाना, मोठा मुलगा आर्यन, लहान मुलगा अबराम, शनाया कपूर, अनन्या पांडे हे सगळे पापाराझींना एकत्र दिसले. विमानतळाजवळील हे व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : “नाटक, अभिनय तुझ्यासाठी नाही…”, पुरस्कार जिंकल्यावर अक्षया नाईकची भावुक पोस्ट; म्हणाली, “गेले ४८ तास…”

आजारपणानंतर अवघ्या एक दिवसातच खास मॅचसाठी शाहरुख घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, विमानतळावर किंग खानची कोणालाही झलक दिसली नाही. मीडियापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी त्याने हुडी घातली होती.

हेही वाचा : Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक

शाहरुख खानच्या कुटुंबासह पांडे फॅमिलीही खाजगी विमानतळावर दिसली. अभिनेत्री अनन्या पांडे आणि तिचे वडील चंकी पांडे सुद्धा कोलकाता नाइट रायडर्सला सपोर्ट करण्यासाठी चेन्नईला रवाना झाले आहेत. आता अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.