एकेकाळी शाहिद कपूर आणि करीना कपूर रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. हे दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दोघेही नात्यात असताना २००३ मध्ये त्यांचा किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची खूप चर्चा झाली होती. आता जवळपास २० वर्षांनी शाहिदने या फोटोबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“गे, लेस्बियन म्हणजे काय?”, अमीषा पटेलच्या ‘त्या’ वक्तव्यावर उर्फी जावेद संतापली; म्हणाली, “२५ वर्षांपासून काम…”

२००४ मध्ये हा फोटो एका क्लबमध्ये क्लिक करण्यात आला होता. यामध्ये शाहिद करीनाला किस करत होता. क्लबमध्ये एका तरुणाने तो फोटो काढला होता आणि नतंर तो व्हायरल झाला. शाहिद ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “त्यावेळी मी उद्ध्वस्त झालो होतो. मी फक्त २४ वर्षांचा होतो आणि मला वाटलं की माझी प्रायव्हसी हिरावून घेतली गेली आहे आणि मी काहीही करू शकत नव्हतो.”

“मला मुंबई शहर आवडतं, पण…”; भरत जाधवने सांगितलं कोल्हापूरला स्थायिक होण्यामागचं कारण

शाहीद म्हणाला, “त्यावेळी नेमकं काय घडतंय हेच मला कळत नव्हतं. त्या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्या वयात तुम्हाला तुमच्या भावनाही नीट कळत नाहीत. तुम्हाला एखाद्या मुलीशी कसं वागावं हे माहीत नसतं, पण तुम्ही डेट करताय आणि त्यादरम्यान अशी घटना घडते. यानंतर मी खूप सतर्क झालो होतो,” असं शाहिदने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहिद कपूर व करीना कपूर यांचं २००७ मध्ये ब्रेकअप झालं. शाहिदने मीरा कपूरशी लग्न केलंय, तर करीनाने सैफ अली खानशी लग्नगाठ बांधली. दोघेही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा आता फरक पडत नसल्याचं शाहिद सांगतो.