scorecardresearch

“आता वेळ आली आहे…”, आमिर अलीशी डेटिंग चर्चांवर शमिता शेट्टीने अखेर सोडलं मौन

एका व्हायरल व्हिडीओनंतर सुरु झाल्या होत्या शमिता शेट्टी-आमिर अलीच्या डेटिंगच्या चर्चा

Shamita shetty, shamita shetty boyfriend, aamir ali, aamir ali girlfriend, rakesh bapat, Entertainment News in, Bollywood News, शमिता शेट्टी, आमिर अली, राकेश बापट, बॉलिवूड न्यूज
शमिता आणि आमिर यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शमिता शेट्टी एका पार्टीमधून बाहेर पडताना दिसली होती आणि त्यावेळी तिच्याबरोबर आमिर अली दिसला होती. तो गर्दीतून तिला कारपर्यत सोडायला गेला होता. त्यानंतर शमिता आणि आमिर यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता शमिता शेट्टीने अखेर मौन सोडलं आहे.

शमिता आणि आमिर अली यांचा पार्टीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. आमिर शमिताला कारपर्यंत सोडायला गेला आणि त्याने तिला गुडबाय किसही दिलं. त्यामुळे दोघांमधील जवळीकतेवरही चर्चा होऊ लागल्या होत्या. अशात आता शमिताने ट्वीट करून डेटिंगच्या चर्चा केवळ अफावा असल्याचं म्हणत नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

आणखी वाचा- Video : “आधी मिठीत घेतलं, गाडीकडे नेलं अन्…” शमिता शेट्टीबरोबर प्रसिद्ध अभिनेत्याने केलेल्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी संतप्त

शमिताने ट्वीटमध्ये लिहिलं, “समाज आणि त्यांच्या सोयीस्कर मानसिकतेला मी कंटाळलले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आणि सत्य जाणून न घेता झटपट निकाल देण्यासाठी प्रत्येकजण न्यायाधीश का बनत आहेत? नेटिझन्सच्या छोट्या मानसिकते पलीकडे बरंच काही आहे.” याशिवाय आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने लिहिलं, “या सर्व गोष्टींबद्दल मन मोकळं करण्याची वेळ आली आहे! मी सिंगल आहे आणि खुश आहे… देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा.”

आणखी वाचा- राकेश बापट- शमिता शेट्टीचं ब्रेकअप! ‘अशी’ झाली होती लव्हस्टोरीची सुरुवात

आमिर अलीने गेल्या वर्षीच संजीदा शेखपासून घटस्फोट घेतला आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. तर शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’नंतर राकेश बापटला डेट करत होती. शोदरम्यान दोघांची भेट झाली होती, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 12:52 IST
ताज्या बातम्या