Kiara Advani & Sidharth Malhotra Welcome Baby Girl : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी या बॉलीवूडच्या स्टार जोडप्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे. सिड-कियारा आई-बाबा झाले आहेत. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणीने गिरगाव परिसरातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मंगळवारी ( १५ जुलै ) गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि कियारा यांची प्रकृती उत्तम असून सिद्धार्थने स्वत: पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थ -कियारा पोस्ट शेअर करत लिहितात, “आम्ही प्रचंड आनंदी आहोत…आमचं जग आता पूर्णपणे बदलून गेलंय. आम्हाला मुलगी झालीये.”

यंदा फेब्रुवारी महिन्यात कियाराने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना दिली होती. यानंतर अभिनेत्री बेबी बंपसह ‘मेट गाला २०२५’च्या रेड कार्पेटवर झळकली होती. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा तिची काळजी घेताना दिसला होता. गेल्या काही दिवसांपासून कियारा सतत रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर आज अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे.

सिद्धार्थ-कियाराबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर दोघांनी ‘शेरशाह’ सिनेमात एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या सेटवर सिड-कियाराच्या लव्हस्टोरीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी या जोडप्याने राजस्थानमधील जैसलमेर येते थाटामाटात लग्न केलं होतं. सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ-कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता लवकरच ‘परम सुंदरी’ सिनेमात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासह जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय कियारा ‘वॉर २’ या बिग बजेट सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. हा सिनेमा यंदा स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असतील. ‘डॉन ३’मध्ये सुद्धा कियाराची वर्णी लागली होती पण, गरोदर असल्याने अभिनेत्रीने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतली होती.