अभिनेता सोनू सूदने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेक गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. अभिनेत्याला लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर सुद्धा सोनू सूद गरजू व्यक्तींना मदत करताना किंवा चांगला सल्ला देताना दिसतो. सध्या अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “रेस्टॉरंटमध्ये जायला आवडत नाही”, रणवीर-दीपिका अशी प्लॅन करतात रोमॅंटिक डेट; अभिनेत्री म्हणाली, “आम्ही दोघेही…”

सोनू सूदने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता तीन मजुरांशी संवाद साधताना दिसत आहे. त्या मजुरांकडे गेल्यावर सोनूला त्यांच्या हातात बिडी दिसते, अभिनेता त्यांना विचारतो, “तुमचे काय सुरु आहे? तुम्ही एकत्र बिडी का ओढत आहात?” हे ऐकून मजूर काहीसे हसतात आणि हो उत्तर देतात.

हेही वाचा : “निसर्गाने लोकांना रेड अलर्ट दिला…”, हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीवर यामी गौतमने मांडले परखड मत

व्हिडीओमध्ये पुढे सोनूला त्यापैकी दुसरा मजूर म्हणतो बिडी वाऱ्यामुळे विझली. यावर अभिनेता म्हणतो, “खूप चांगले झाले कारण, बिडी विझल्यामुळे तुमचे आयुष्य तरी वाढेल. बिडी ओढणे बंद करा, यामुळे तुमची तब्येत सुधारेल. कुटुंबातील सदस्यांचा विचार करा. बिडी ओढणे सोडलेत तर तुमचे आयुष्य नक्की वाढेल.” असा सल्ला अभिनेत्याने या तीन मजूरांना दिला. अभिनेत्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “तिथे एक बेशुद्ध मुलगी दिसली अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू सूदला हे तिन्ही मजूर शेवटी आम्ही पुन्हा कधीच बिडी ओढणार नाही असे वचन देताना दिसतात. अभिनेत्याने तिघांकडील बिडी जप्त केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, सोनू सूदने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.