बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. नुकतंच एक पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली होती. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिची आणि तिच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यादरम्यान तिने तिच्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल भाष्य केले आहे.

सुश्मिता सेनने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. त्याबरोबर तिने तिची अँजियोप्लास्टी झाल्याचेही सांगितले आहे. सुश्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या वडिलांबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सुरुवात तिने वडिलांनी दिलेल्या सल्ल्याने केली आहे.
आणखी वाचा : सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच दिग्दर्शक रवी जाधव यांची कमेंट, म्हणाले, “तू कृपया…”

“तुम्ही तुमच्या हृदयाला कायमच खंबीर आणि आनंदी ठेवा. कारण तुमच्या वाईट काळात ते कायमच तुमच्या पाठिशी उभे राहील. हा सल्ला मला माझ्या वडिलांनी दिला होता”, असे सुश्मिताने यात म्हटले आहे.

“मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजियोप्लास्टी झाली होती. माझे हृदय आता योग्यप्रकारे काम करत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कार्डियोलॉजिस्टने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे की माझे हृदय खऱ्या अर्थाने खूप मोठे आहे.

मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत, ज्यांच्यामुळे माझ्यावर योग्यवेळी उपचार करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळेच मी आज नीट आहे. काही दिवसांनी पोस्ट करत मी त्याबद्दल सविस्तर सांगेनच. ही पोस्ट मी आता फक्त माझ्या चाहत्यांना माझ्याबद्दल अपडेट देण्यासाठी केली आहे. त्याबरोबरच मी ठिक आहे ही आनंदाची बातमी देण्यासाठी केली आहे. मी आता माझे जीवन पुन्हा एकदा जगण्यास सज्ज आहे. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते”, अशी पोस्ट सुश्मिताने केली आहे.

आणखी वाचा : सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुश्मिता ही लवकरच ‘ताली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी ती व्यावसायिक ललित मोदी यांच्याबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. सुश्मिताने अद्याप लग्न केलं नसून तिने रेनी व अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.